Saturday, September 12, 2026

श्री

श्री 

मनाला विलीन होऊ द्यावे लागते, म्हणजेच भगवत भाव वाढवायला लागतो, श्रद्धा वाढवायला लागते आणि अहं भाव त्यात विलीन होऊ द्यावा लागतो. म्हणजे जे काही अहं भाव दर्शवेल, ते निमित्त म्हणून त्यात परिवर्तन होऊ द्यावे लागते, सूक्ष्मात पदार्पण होण्यासाठी. सूक्ष्म माध्यम आहे, असे तेव्हाच ध्यानात येऊ शकते, जेव्हा स्वतःचे मन तसे झाले की. 

म्हणून मन, स्तर, व्यवहार, चक्र, भाव, परिणाम, भोग, द्वैत, अनुभव, विचार, भावना, देह - हे गूढ असतात आणि ह्या घटकांच्या "असण्यामुळे" _मी वावरतो_. थोडक्यात ह्या घटकांच्या आधारामुळे किंव्हा अस्तित्वामुळे, "मी" हा भाव प्रस्थापित झाला आहे आणि त्या प्रमाणे अनुभव घेत राहतो प्रवाहाचे आणि प्रवासाचे. 

असण्याला काही "कारण" असे लागत नसते. म्हणजे मुळात आपल्या दृष्टीने "कारण" ही संकल्पना इतर गोष्टींवर मांडली जाते (परावलंबित असते). आणि मन प्रस्थापित होण्याचे "कारण" भगवंत माध्यम असते. पण _कारण_ ह्या शब्दाला आध्यात्मिक अर्थ द्यावा लागतो. ह्याचा अर्थ की _कारण_ हे दृश्याच्या स्वभावाशी निगडित न करता, _शरणागतीशी_ निगडित होणे जरुरीचे ठरते. 

पूर्ण शरण जाणे, मोकळे होणे, सूक्ष्म होणे, अंतर्मुख होणे, श्रद्धेचे स्थान बळवंत होऊ देणे, शांत होणे - हे सर्व एकच आहे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home