श्री
श्री
आपले होणे, वावरणे, प्रवास घडणे, प्रवाहात राहणे, संबंधित असणे, अनुभव येणे, स्मरण असणे, हालचाली जाणवणे, कृती मध्ये राहणे - ही सर्व भगवत इच्छा म्हणून ओळखावी आणि निश्चित पूर्णपणे स्वीकारावी.
_स्वीकारणे_, ही क्रिया, सध्याच्या परिस्थितीतून ते शांतीकडे जात राहताना घडत असते. किंव्हा विलीन होण्याचा प्रवास घडतो आणि तो गूढ असतो आणि श्रद्धेने आत्मसात व्हायला लागतो.
त्याचे दुसरे नाव म्हणजे *समाधान*. आणि तात्विक भाग सांगायचा झाला तर ह्याला *स्थिर होणे*, असे संबोधले आहे. किंव्हा वासना विलीन होणे आणि भगवंताकडे केंद्रित होणे, असेही संबोधले जाते.
सर्व प्रकाराच्या वासना, बुद्धी, भावना, देह, इंद्रिये, विघटन, अर्थ, हेतू, प्रश्न, नाती, काम, व्यवहार, दृश्य - भगवत भाव प्रस्थापित होण्यासाठीच वापरावे. सर्वांच्या केंद्रस्थानी भगवंत असतो, म्हणून तेच सत्य ठरते. त्या केंद्रस्थानीचा अनुभव येण्यासाठी, स्वतः विलीन होणे आवश्यक आहे. विलीन होणे, म्हणजे शिथिल होणे, आसक्ती कमी होत जाणे, वगैरे.
त्या सर्व गोष्टी आत्मसात होऊ द्यावे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home