श्री
श्री
विलीन जरी व्हायचे असले, तरीही मार्ग अहं भावनेतून _गवसायला_ लागतो. हा अहं भाव कसा निर्माण होतो, हे जाणून घ्यावे आणि त्यातून एक भले मोठ्ठे प्रपंचाचे वटवृक्ष कसे होते, हे बघावे.
अस्तित्वात असताना, वासना आणि त्यातून विचार खूप शक्तिमान प्रकरण आहे, जी ती कुठून येते हे कळत नाही, त्यात गुंतायला होते, त्यातून द्वैताचा अनुभव होतो, त्यातून व्यवहार करण्याची गरज भासते आणि त्यात गुंतायला होते. ही _शक्ती_ आहे, हे ओळखावे आणि त्यातून बऱ्याच गोष्टी येत राहतात, वावरत राहतात आणि निघून जातात - किंबहुना असे दर्शन तरी होते मनाला! वेगळेपण आणि तात्पुरत्या भावना ह्यांना धरून ठेवल्यामुळे, हे वरील प्रकरण मनात भीती निर्माण करते आणि सिद्ध होण्याचा अर्थ बाहेर प्रस्थापित करत राहते.
स्वतःच्या रूपाला सत्य मानून सुरुवात करायला लागते आणि ते शिथिल होऊ द्यावे लागते. त्यातून भगवंताचे दर्शन होते. म्हणून स्वतःचे प्रश्न, शोध, दुःख, सुख, परिस्थिती ह्यांना शांतीने सामोरे जाणे येते, कारण तो एक टप्पा ठरतो शांतीकडे जाण्याचा.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home