Friday, June 23, 2023

श्री: शक्तीचा दसरा भाग

श्री: शक्तीचा दसरा भाग

आज मनात असा विचार येतोय कि आपण विषयाच्या आधीन किती असतो! एखाद्या शाश्वतीसाठी आपण किती पहलू बघतो, त्रास करून घेतो, जर-तर भूमिका पत्करतो, भीती बाळगतो, श्रद्धा ठेवत नाही, देहरूपी विचार करत बसतो, बदल अनुभवायला नाराजीचा सूर व्यक्त करत राहतो...आणि हे काही प्रकरण संपत नाही!

कुठलाही विषय घ्या, आपल्या अस्तित्वाची व्याख्याच बघा! वरील सर्व विचार लागू होतात! म्हणजे विचारांच्या पाठीमागे काहीतरी आहे जे मनात गोष्टी, कल्पना, तर-वितर्क, संकल्पना, भावना, निर्माण करत राहतात. हे सर्व “काल्पनिक जग” म्हणून संबोधित केल आहे, ज्याच्या मध्ये आपण निर्माण होतो, विचार निर्माण होत राहतात आणि आपण कृती मध्ये गुम्फलेलो जातो. विचार काहीही केल्या सुटत नाही, थांबत नाही आणि आपण शांत होत नाही. आणि हाच आपला खरा आजार आहे. One “refuses” to be relaxed.

अस्तित्व ह्यालाच म्हणतात. प्रयत्न आहे स्वतःला शांत करण्याचा. शांत होऊ शकतो जेव्हा भागवत वस्तूची प्रचीती येते. म्हणजे आपण स्वतःच्या प्रयत्नांना किवा अनुभवांना “दोष” देत नाही, शाश्वतीचा अट्टाहास सोडतो, बदल स्वीकारतो, कोणामुळे, का, कधी, केव्हा, कसा – ह्या सर्व प्रश्नांचा परिणाम स्वतःवर पाडून घेत नाही किवा त्यावरून स्वतःवर दोष निर्माण करून घेत नाही.

निर्माण काय करायच आहे – ते अस्तित्वाच्या शक्ति मध्ये पुरेपूर शक्य आहे. निर्माण काहीही होत राहणार आणि त्याच शक्ति मधून आपण झालो आहोत. तर अस्तित्व म्हणजे शक्ति आणि विलक्षण घडण्याची क्रिया. आपण निर्मिती आहोत, शक्ति आहेच त्या निर्मितीत. आणि शक्ती म्हणल तर “भगवंत” आहेच!  

आपण काय व्हाव आणि काय बनाव ते आपल्या हातात आहे – निर्माण क्षमतेमुळे. भगवंत आपण होऊ शकतो किवा दृश्यात रमू शकतो. आपला हित आपल्याला शोधायच आहे आणि बनायचं आहे.

हरि ओम.

 


0 Comments:

Post a Comment

<< Home