Thursday, August 10, 2023

श्री

 

श्री

प्रत्येक क्षण कशानेतरी “भरलेलाच” असला पाहिजे असा अट्टाहास धरणे म्हणजे वेडेपणा आहे. म्हणजे सतत वेगवान कृती करत रहा आणि असा एकही क्षण असू नये जेव्हा काहीच होत नाही आहे! कुठे चाललेलं आहे जग हे कळत नाही आणि सतत काहीतरी करत राहणे आणि डोक्यामध्ये खुराक चालू राहणे हा एका प्रकारचा रोग आहे. हा रोग भीती मुळे येतो आणि हि भीती भगवंताची किवा अस्तित्वाची जाणीव पूर्णपणे पटलेली नसल्यामुळे उद्भवतो.

उद्धवणे ही क्रिया निर्मिती मधून होते किवा सूक्ष्मातून होते; मग ती बदलत राहते आणि शेवटी ती सूक्ष्मात परत विलीन होते. सर्व वृतींचा आणि कार्यचा उगम अदृष्यातूनच होतो आणि अदृश्याच अस्तित्व कायम राहत आणि बदलत नाही. हे आपल्याला कळत नाही कारण “मन” हि संकल्पना किवा वस्तू दृष्यातूनच उद्भवलेली आहे म्हणून तसेच संस्कार त्यावर होत राहतात. सत्य किवा सुक्ष्म होणे म्हणजे तोच स्वभाव आत्मसाद होणे.

त्यासाठी आपल्याला स्वतः मध्ये स्थिर व्हायला लागत. म्हणजेच सूक्ष्म होणे; नामस्मरण करणे; स्वीकार करणे; सत्य ओळखणे; दुसर्यांना नावं नाही ठेवणे; मोकळ्या मनाने सर्व गोष्टींकडे बघणे; कुतुहूल वाटणे; प्रेम करणे; माफ करणे वगैरे. आणि हेच मूल्य सर्वात महत्वाचे मानणे आयुष्यात.

आपण स्वतःला देखील खूप धार्यावर धरत राहतो आणि अट्टाहास बाळगत राहतो सर्व गोष्टी बरोबर घडण्याच्या बाबतीत. आपण स्वतःलाच खूप गोष्टींच्यासाठी कारणीभूत धरत राहतो आणि स्वतःला माफ करत नाही. अस करू नये. वेळ मोलाचा आहे आणि अनादाचाही आहे.

मान्य आहे कि आपण अपूर्ण आहोत आणि तात्पुरते आहोत – पण आहोत ना?! मान्य आहे कि गोष्टी बदलणार आहेत आणि आपल्याला आतून गहिवरून येईल. मान्य आहे कि आपल्याला कुठल्याच गोष्टींची शाश्वती वाटत नाही आणि त्याचीच भीती वाटते. तरीही आपण भगवंताचा नमुना आहोत आणि त्याच्या इच्छ्हेनेच आलो आहोत आणि जग अनुभवतो.

दुसरी गोष्ट कि सूक्ष्म शक्तींच्या अस्तित्वामुळे खोल्वर काही भावनांची  उत्तर समाधानकारक मिळायला बराच काळ द्यायला लागतो आणि तो काळ देणे म्हणजे स्वतःमध्ये परिवर्तन आणणे. भलेही भावनांचा उगम कळत असेलही, पण त्यावर उपाय करायला सध्याचे  जाणवणारे विचार वेगळ्याच स्थूल प्रकृतीमुळे योग्य तो परिणाम देत नसतील. त्या विचारांना देखील सूक्ष्म करणे अपरिहार्य ठरेल आणि त्या होण्यामध्ये आपला निर्णय बदलेल (हेतू बदलेल). ह्या सर्व प्रवासामध्ये आपल्याला शांत राहणे आवश्यक आहे आणि श्रद्धा वाढवणे गरजेच आहे. भगवंत आहेच.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home