Wednesday, August 09, 2023

श्री: मोकळ

 

श्री: मोकळ

नाही करणार काहीही मी. अस करा किवा तस करा...हे काय जगणं आहे का?! जस कि मी काही करण्यासाठीच जन्म घेतला आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे कि मला काय वाटतंय, आणि मी कोण, माझे विचार काय, आणि ते कसे आले आणि ते कसे बदलत राहतात! So much of a burden! विचार येतात, उद्भवतात, बदलतात आणि मावळतात – सूक्ष्मातून स्थुलात अवतरतात आणि परत सूक्ष्मत गडप होतात. त्यात मी, तु आणि इतर काही आकार तैय्यार होत राहतात. म्हणजेच कि माध्यम एकच आहे जे संकल्पना आणि गती निर्माण करत राहत – ती शक्ति त्या माध्यमातच आहे. त्या माध्यमाचा स्वभाव आणि अस्तित्वाची शक्तीच तशी आहे कि निर्माण करत राहते आणि बदल दर्शवते – त्याला तुम्ही किवा मी तरी काय करणार?! मी का आलो आणि कुठे जाणार आहे आणि मी कोण, ह्याचा मागोवा आणि ठोस कारण मलाही माहीत नाही! कधी असा अनुभव येतो आणि कधीतरी वेगळा आणि जो काही अनुभव येतो त्यातून मी ठरत नसतो फक्त एक अस्तित्व दर्शवत असत. मग काहीतरी करून दाखवण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कुणाला? कोण विचारणार आहे कि सत्य काय आहे आणि कुणाला इंटरेस्ट तरी आहे का हे समजुन घेण्यात? आणि इंटरेस्ट असता तर बोलण्याची काही गरज राहिली नसती! आणि आपणच राहिलो नसतो तर कल्पनाच करायला नको, काय?!

हे प्रश्न स्वतःला विचारणे महत्वाचे आहेत कारण आपण जग कसे अनुभवतो – हे उमगत जात हळूहळू. बर जगाच स्वरूप “कळायलाच” पाहिजे असा अट्टाहास धरणेही कदाचित बरोबर नाही कारण आपण आनंद तरी कधी घेणार मग? पाकळी कशी उमगते तसं काहीसं जगण पाहिजे – पाकळी उमगते, ती का, कुणासाठी, कधी, कश्यावरून असे फाजील प्रश्न तिला येतात का? ती उमगते आणि ते “पुरेस” आहे. There is no purpose in beauty/ delight. It only exists. अस आपल्याला अनुभवता येईल का जगणे? जस कि मनात कुठलाही हेतू नाही – हे का कराव, कश्यासाठी, कधी, कुठे, कुणीकडे वगैरे, वगैरे. म्हणजेच कि मोकळं असावं मनाने. मन मोकळ म्हणजेच कि वृत्ती उद्भवायला देणे, आपल कर्तव्य श्रींची इच्छा अस जाणणे आणि जे होईल आणि जे घडणार आहे त्याला प्रसन्न मनाने सामोर जाणे आणि स्वीकारणे.  “मी” एक संकल्पना आहे – ती बदलते आणि परावलंबित असते – ती सत्य नाही; ती परिस्थिती निर्माण करत राहते आणि त्यातच गुंतत राहते. म्हणजेच निर्माता “मी” नाही, कुठलतरी वेगळच माध्यम आहे! त्या माध्यमाला शरण जावा. उद्याची काळजी नको, ह्या क्षणाची चिकित्सा नको आणि कालची खंत नको – सर्व “तोच” निर्माता आहे, काळ त्यानेच स्थापित केला आहे आणि त्याच बरोबर स्थळ. उत्तर बुद्धीच्या माध्यामतून शोधू नका कारण ते समाधान देईलच अस नाही आणि नेहमी आणखीन वेगळ करायला सुनावेल. प्रत्येक “पुढच्या” क्षणाला आणखीन सत्याचे पहलु कळतात. त्यावरून नवीन क्षणाची व्याख्या ठरत नाही किवा ठरवण्याचा अट्टाहास करू नये. आणि त्यालाच जिवंतपणा म्हणतात. आता जिवंतपणा हे देखील पटवण्याच रसायन नाही! ते आहेच. आणि त्याचा आनंद घेण्यासाठी, श्रींच कार्य जाणीवात आणणे जरुरीच ठरत. श्रद्धा ठेवा.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home