श्री: मी असा असावा...
श्री: मी असा असावा...
‘मला’ अस म्हणायचं आहे की कदाचित आत्मचिंतन करणे हा
अपरिहार्य घटक होत जाईल माझ्यासाठी. ते का, कशासाठी, केव्हा, कुठे - हे काहीच
माहीत नाही आणि माझा काही अट्टाहास नाही कि ह्याचा परिणाम काय होईल तो समजायलाच हवा.
ह्याच सोप्प उत्तर अस आहे की करता “तो” आहे; सर्व वृत्ती त्याच्यातूनच आल्या आहेत,
म्हणून उद्भवण्याची कारणे आणि मावळण्याची कारणे आपल्याला ठाऊक नसतात आणि गोष्टी
होत राहतात हे स्वीकाराव लागत. त्या स्वीकार्ण्यामध्ये कुठल्या अनुभवांना सामोर
जावं लागत हे हि माहीत नाही. तर मी कोण आहे आणि काय हवय आणि कुठे जाणार आहे – ह्या
बद्दल ठोस कल्पना नाही माझ्याकडे – पण त्यावरून ‘मी’ किवा माझ अस्तित्व ठरत नाही.
कारण गोष्टी माहीत नाही बर्याच म्हणून आपण काही ठरत नसतो. ह्याचाच अर्थ असा होतो
कि भगवंत माध्यम आहे सर्व काही गोष्टी होण्या करता आणि त्याच्या मध्येच सूक्ष्म शक्ति आहे आणि क्रिया देखील आहे.
आपल्याला तो “कोरा” कळत नाही किवा कळण्याच्या पलीकडे असावं लागत आणि त्यालाच
प्रयत्न म्हणतात.
माझ्या बद्दलचे विषय आहेत, मी कदाचित भावना प्रधान
आलो आहे, भावनांचा गूढ रहस्य स्वीकारल्या शिवाय चैन पडत नाही मला आणि ते गूढ रहस्य
भरपूर कालवाकालव करत राहत. ते शब्दात मांडता येत नाही, सांगता येत नाही, कुठल्याही
कार्यात दाखवता येत नाही तरीही ते अनुभव निर्माण करत राहत आणि मला बेचैन करत. ते
लिहून सुद्धा संपत नाही, सतत निर्माण होत राहत आणि मला कार्य करायला लावत.
त्याला दुर्लक्ष करून चालत नाही, थोपटून चालत नाही,
उफाळून चुकीच ठरत. त्याच ऐकायला लागत, तो काय अनुभव देत आहे ते ऐकायला लागत आणि
बेचैन जरी केल, तरीही मनाला समजून द्यायला लागत कि प्रकार काय आहे तो. हि भाषा इतर
लोकांना कळेलच असही नाही आणि त्यावरून एकट वातण्याच कारण नाही....भगवंताने मला इथे
आणल आहे, तर नकीच काहीतरी प्रयोजन केल असेलच त्याने – फक्त ते मला पूर्णपणे माहीत
नाही कारण अजून शांत होण्याची आणि त्यावर श्रद्धा ठेवण्याची गरज आहे.
मी भावनीक आहे, त्यात काय चुकल? आणि ते जुमानून
काहीही मिळवल तरी ते मनाला लाभत नाही कदाचित. ह्या वृत्ती दिल्या आहेत – त्यावरून पुढे
किवा पलीकडे जायचं असत. “पलीकडे” जाणे किवा होणे म्हणजे त्याला कुठलीही
स्थिती येऊ देणे, कुठलही रूप घेऊ देणे – त्यात पैसा कुठे आहे ते भगवंत बघून घेईल.
आज मी असा आहे, उद्या कसा असेन ते बुद्धीला माहीत
नाही; भगवंताला माहीत आहे – तर त्या असण्यावर श्रद्धा ठेवावी. उद्या काय होईल किवा
पुढच्या क्षणी काय होईल ते भगवंत बघुन घेईल – आपण श्रद्धा ठेवावी.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home