Friday, August 25, 2023

श्री: सूक्ष्म

 

श्री: सूक्ष्म

सूक्ष्म होणे हा एक अभ्यास आहे. म्हणजे तो ज्वलंत प्रश्न ठेवायला लागतो आणि तेच सर्वात महत्वाच कोड आहे हे पटवून घ्यायला लागत – तरच त्या प्रवासाला आपण पदार्पण करतो. म्हणजेच सर्व कोडांच मूळ तिथेच सापडत. सर्व प्रश्न तिथे येऊन थांबतात.

आता हा ज्वलंत प्रश्न होण्यासाठी देखील श्रद्धा वाढवावी लागते आणि खूप काळ भगवंत म्हणजे काय आणि त्याच नामस्मरण का कराव हे समझुन घ्यायला लागत. कुठलीही गोष्ट असली किवा आली किवा गेली – त्यावरून आपली शांतता अवलंबून असता कामा नये. आपण जग नाही, विचार नाही, वृत्ती नाही – म्हणजे आपण ह्यातून सध्या बनलेलो जरी असलो तरी मुळचा स्वभाव आपला तो नाही.

अनेक जन्म वृत्ती, भावना, विचार आणि कार्य मध्ये गुन्तून असल्यामुळे आपल मन आणि अनुभव दृष्यमय झाले आहेत. आपल्याला गोष्टी “दिसतात” आणि आपण त्यावर काहीतरी प्रतिक्रिया देतो म्हणजे काय करतो नेमक आणि का? हा गूढ प्रश्न आहे, वरवरचा नाही आणि तो गूढ जाणवला कि त्यावर काम करणे आल. “दिसणे” कसं घडत आणि प्रत्येक आकार दिसणे म्हणजे काय? आकार काय आहे, काश्यानी दिसतं राहतो, आणि काय विचार मनात उमटवतो? म्हणजे ह्यामध्ये स्व आहे, दिसणे हि क्रिया आहे, दुसरा आकार आहे आणि हे सर्व घडत असतांना काहीतरी प्रतिक्रिया आहे. स्वतंत्र अस काहीच नाही आणि एकमेकात गुंतलेल प्रकरण आहे. ह्या सर्व गोष्टीना आपण स्थळ आणि काळ संबोधित करतो. आणि ह्या दोन्ही शब्दाना एकत्र करण्यासाठी शब्द आहे – “अस्तित्व” किवा “शक्ति”.

म्हणजेच अस्तित्व किवा शक्ति कार्य करते – आपल मन नाही किवा बुद्धी नाही किवा डोळे नाही किवा आकार नाही किवा बदल नाही. बाकी सर्व घडामोडी त्या शक्तीचे प्रतिक आहेत. म्हणून “मी” अस काही वस्तू नाही – ती तात्पुरती आहे. आकार सत्य नाहीत, दिसणे खर नाही, प्रतिक्रिया त्यावरून खरी नाही. म्हणजेच त्यावरून ठरवलेल्या भावना योग्य नाहीत.

मग भावना कशी हवी? भावनाचा खरा अर्थ आहे अस्तित्व-भावना किवा त्या शक्तीची सत्य जाणीव. भावना निर्दोष पाहिजे आणि स्थळ + काळाच्या चौकटीच्या पलीकडे हवी. त्या भावनेला कसलाच धक्का बसता कामा नये, म्हणजे ती स्थिर पाहिजे.

आता प्रश्न आपल्यासाठी असा आहे कि काय केल्यामुळे आपण त्या भावनेत रुपांतर होऊ?

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home