Thursday, August 24, 2023

श्री: मी कोण?

 

श्री: मी कोण?

सत्य जाणणे हे दर्पण ठरू शकत. मला माहीत नाही कि सत्य काय आहे, पण अस्तित्व मला त्रास देत – प्रश्न बरेच पडतात कि आपण कोण आहोत, आपल्याला राग का येतो, आपण का दुखावतो, आपण कश्यासाठी इथे आलो आहोत, जग म्हणजे तरी काय, आपण कशाला घाबरतो आणि काय मिळण्याचा प्रयत्न करत राहतो वगैरे...आपण बेचैन का असतो सतत, कसली भीती मनात आहे. आपण स्वतःला “सिद्ध” करण्याचा अट्टाहास का बाळगतो? सिद्ध करणे म्हणजे तरी काय आणि का आणि कुणासाठी? कुठल्या प्रकारे स्वतःला सिद्ध करणे – हा प्रश्न सुद्धा भेडसावून सोडेल अधिकाधिक.  

सध्याच वातावरण किवा बदलांचा वेग खूप आहे आणि एक गोष्ट दुसर्याला कशी कारणीभूत असते हे कळत नाही. व्यवहाराच्या दृष्टीने अनेक गोष्टी आपल्याला कळायला हव्या असतात – अशी अपेक्षा आपण धरतो – वस्तूचा स्वाभाव काय, काय अपेक्षित आहे, आपल कार्य काय, ते कसं त्या वस्तूवर आधारित आहे, आणि अशे असंख्य परावलंबित गोष्टी ज्यावरून आपण आपल अस्तित्व निर्माण करत राहतो. “निर्माण करतो” – हे होणारच आहे – त्याला मी किवा तुम्ही किवा ती वस्तू थांबवू शकणार नाही. म्हणजे निर्माण होणे हि गोष्ट समझणे महत्वाच आहे आपल्या शांततेसाठी.

दुसरी गोष्ट अशी कि आपण काहीही विचार केला – सात्विक किवा तामसिक – तो एकाप्रकारच्या इच्छांना बळकट करत राहणार आहे आणि त्याच प्रकारच्या वस्तूंना किवा परिस्थितींना निर्माण करत राहणार आहे. म्हणजे निर्माण शक्तीच्या मुळाशी “वृत्ती” चा उगम आणि मावळणे कारणीभूत असावेत. आपल्याला कल्पना नसते कि आपण जेव्हा अनुभव निर्माण करतो किवा वस्तू बघतो, किवा व्यक्ती अनुभवतो – त्याच्या पाठीमागे कितीतरी सूक्ष्म आणि विस्तारलेले विचार असू शकतात – जे दृश्याला कारणीभूत ठरवतात. म्हणून गोष्टी घडण्याला ठोस एका बिंदूच कारण नसत आणि ती का निर्माण होते हे हि बुद्धीला कळत नाही – आणि तीच “भीती” ह्या भावनेला जन्म घालते! थोडक्यात, बुद्धी हि मनाची स्थिती आहे, जिच्या पलीकडेही सूक्ष्म स्थिती असतात आणि जे बुद्धी आणि वस्तू निर्माण करतात. म्हणजे बुद्धीच्या आधीही (ऊर्ध्वगती) काहीतरी आहे. ती अवस्था बर्याच गोष्टींना नर्माण करते किवा बर्याच गोष्टींच्या मुळाशी असते आणि ती विशेष बदलत नाही. म्हणजे गोष्टी कश्याही झाल्या तरी त्यातून “मी” सिद्ध होण्याची गरज नाही आणि त्यातून “मी” चं अस्तित्व ठरत नाही. “मी” कारणीभूतही नाही आणि “मी” अनुभवही नाही. “मी” आकारही नाही आणि “मी” वृत्ती देखील नाही.

अस लिहून सुद्धा तशी भावना जागृत करायला लागते. काहीही झाल तरी बिघडत नाही. कुठल्याही प्रकारचा बदल झालाच किवा जाणवला आणि तो समोर आला तरी आपल्याला उद्देशून नसतोच आणि त्यातून आपण काहीतरी ठरत नसतोच! हे जाणणे फार महत्वाच आहे – खूपच. व्यवहारामध्ये किवा अस्तित्वात भगवंताच्या शक्तिमुळे असंख्य गोष्टी होत राहतात (त्यात आपणही होतो) आणि ह्या सर्वांच एक घट्ट जाळ तैय्यार होत. त्या ओघाने आपल कार्य होत राहत – विचार, भावना, कृती वगैरे. हे सर्व गोष्टी भावनिक पद्धतीने जाणून घेतल्या तर आपण शांत होऊ शकू. सध्या आपण अपुरे आहोत म्हणून मनात गोंधळ आहे आणि सतत काहीतरी करत राहण्याची इच्छा आहे. तसं राहूदे आणि त्यातून परत आपल भवितव्य किवा आपल व्यक्तिमत्व ठरत नाही किवा आपण त्या गोष्टीचा ठेका काही उचललेला नाही.

गोष्टी होणार, ते उद्भवणार आणि मावळणार. त्याच्या मध्ये आपल्याला काहीनाकाहीतरी वाटत राहणार आणि आपण काहीतरी कार्य करत राहू. हे जरी असलं तरीही ह्या जाणीवेला भगवंताची जोड दिली तर आपण शांततेकडे वळू.

“वेळ गेला” अस समजू नका. कारण वेळ आपण निर्माण नाही करत – तो होत राहतो. आत्ता अस कार्य केल कि त्याच फळ अस होईल पुढे हे काही ठोसपणे सांगता येत नाही आणि येऊ घातलेलं फळ काहीकेल्यास टाळता येत नाही (आणि टाळूही नये). म्हणजेच आपल्या मर्जीने काहीच होत नसत! मग मर्जीच जर ठेवली नाही तर आनंद नाही का येणार? म्हणजेच सर्व आपलच आहे हि भावना वाढवणे. अर्थात दिसत तेवढ सरळ नाही, कारण सध्या आपण सूक्ष्म नाही. सूक्ष्म बनत गेलो तर मार्ग सरळ होत जाईल आणि श्रद्धा वाढत जाईल. “आपलच आहे”  हि भावना सध्या अपूर्ण आहे (परिस्थितीशी संबंधित आहे) म्हणून श्रद्धा नाही त्या शब्दावर. ती खोलवर भावना व्हायला हवी कि मग आनंदाचा स्त्रोत निर्माण व्हायला लागेल.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home