श्री: विश्लेषण
श्री: विश्लेषण
स्पष्टीकरण देणे हे काही गरजेच
नाही. भीती खूप खोलवर गेली आहे आणि ती का, कुठे, कशी, उद्भवते ह्यासाठी खूप
प्रयत्न करायला लागतात. तसं म्हणलं तर सर्व काही विश्लेषण आहे, काळ्या दगडावरची पांढरी
रेग नाही! म्हणजेच कि ठोस कारण संकल्पनेसाठी आणि निर्मितीसाठी काहीही नाही. आपण
कोण आहोत, कार्य म्हणजे काय, अस्तित्वाची शक्ति म्हणजे काय, वृत्ती म्हणजे काय आणि
काय अनुभवायला येत – हे सार विश्लेषण आहे. करणारा तूच आहे श्री, आम्ही फक्त
अनुभवतो तुझी शक्ति.
विश्लेषण म्हणल तर ते जन्मो जन्मी
एका वृत्तीतून आल आहे. त्यातून आपण होतो, आपण बघत राहतो, कार्य करतो आणि आकार
अनुभवतो. आकार म्हणल तर परिस्थिती, बदल, संबंध, कारण, वृत्ती, विचार,
भावना, अनुभव, स्थळ, काळ, निर्मिती त्यावर अशे अनेक “क्रिया” होत राहतात. तु
आकारात येतोस म्हणजे तुझी शक्ति प्रत्ययास येते आणि बर्याच गुणांनी स्वरुपात येते.
हे आकारात येणे आणि मावळणे म्हणजे तुझी शक्ति. तुझा अस्तित्व अस घडवून आणते तर
त्याला ठोस कारण आणि घाबरणे आणि स्पष्टीकरण देण्यात काय अर्थ आहे?! जे आहे ते आहे,
नाही का?
मी कुठला प्रश्न घेऊन आलो आणि
त्यातून कुठल्या गोष्टी आठवतात आणि कुठले प्रसंग आणि कुठले आकार हे गूढ आहे. एका
प्रकारचे वृत्ती का पोसले जातात, हा हि प्रश्न गूढ आहे. अस का तर माहीत नाही –
स्पष्टीकरण देऊ शकीन, पण त्याने काय होणार आहे? स्पष्टीकरण दिल तर माझाच अहंकार
पोसला जाईल आणि हे घातक आहे. म्हणजे अहंकारामुळे, आपण अनुभव निर्माण करत राहतो आणि
अहंकार म्हणल तर तुझी आठवण विसरणे. तु आणि मी काही वेगळे नाही, पण हेच मला कळत
नाही. जिकडे पहावे तूच आहे, आकार नाही. ते मला कळायला हव.
दुसरी गोष्ट अशी कि मानव म्हणल तर
तात्पुर्तेपणा आला – त्या भावना आल्या. त्याला का घाबराव? आणि ते कधी “झाकून” टाकता
येणार आहे का? आपण नेहमीच “उघडे” पडले आहोत – वृत्तींमुळे. झाकण्याचा प्रश्नच येत
नाही – स्वतःला कळल तरी खूप आहे. ह्या सर्व काही विश्लेषणात्मक परिस्थितीतून शांत
व्हायचा प्रयत्न हाती घ्यायचा आहे. कोण काय म्हणतय आणि काय होईल – हा मुद्दाच नाही
आहे. काय दिसतंय हा हि मुद्दा नाही. आणि दुसरे लोक म्हणजे कोण हा हि मुद्दा नाही.
मुद्दा आहे कि “मी” म्हणजे कोण? आणि “मी” असा का आहे, का झालो आणि कुठे जाणार आहे?
स्वतःच चिंतन आहे – हि शक्ति समजून
घ्यायची आहे – स्पष्टीकरण कोणी विचारत नाही!
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home