श्री
श्री,
आपली वृत्ती अशी असते की "मला ही गोष्ट पाहिजे", त्यामुळे गोष्टी अनुभवास येतात. पण प्रकरण तिथे संबत नाही. एका गोष्टीतून अनेक गोष्टी पर्यंत आपली मजल पोचते आणि त्याचा ठाम पत्ता ही स्वतःला लागत नाही. म्हणजे असंख्य गोष्टी वेगळ्या नसतात....त्या एकाच अतृप्त वासनेतून उद्भवलेल्या असतात. "गोष्ट हवी आहे" हे अतृप्ततेच लक्षण आहे आणि कितीही केलं आणि कितीही ताट भरलेलं पुढे वाढलं तरीही भूक कमी होत नाही...उलट ती वाढून सगळ्यांना भस्म करू शकते. म्हणून त्या अर्थाने कश्यात आपण गुंतत आहोत, हे बघणे गरजेचं आहे. त्याला "विषय" असे सांगितलं आहे. विषय एकच असतो - तात्पुरत्या स्थितीतील वासना किंव्हा अतृप्तपणाची जाणीव. त्या विषयातून आपण असंख्य जन्माच्या फेरीत गुंतून राहतो. काल, आज, उद्या, इथे, तिथे, मागे, पुढे...स्वस्थ बसून नाम घेता येत नाही. ही आपली मनस्थिती.
म्हणून काहीही मागू नये, कारण त्याने आपलं हीत अजिबात नाही. मगायचच झालं तर दिलेल्या परिस्थितीत समाधानी असणे ही वृत्ती मागावी. सर्व काही देव आपल्याला देतो. आपण असमाधानी वृत्तीला धरून राहतो मग तो ते पुरवतो!
समाधानी राहण्यासाठी प्रयत्न करायला लागतात जीवाला. त्यासाठी गुरूंकडे बघावे आणि ते जे सांगतील ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करावे. त्याने समाधान वृत्ती निर्माण होईल.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home