Friday, May 24, 2024

श्री

 श्री,


एखादी वस्तू "अनुभवणे" किंव्हा ती दृश्यात बघणे किंव्हा तिची जाणीव होणे किंव्हा ती अस्तित्वात असणे हे साऱ्या गोष्टी एक आहेत आणि त्यावरून आपली मनाची स्थिती कळते -

वस्तू अनेक प्रकारच्या आपल्या  वृत्तीतून, विचारातून झाली असते, म्हणून अमुक एका विचार मधून वस्तू दिसणे असं होत नाही. 

तिचा उगम कधी झाला आणि तिच्या बरोबर आपला कसा संबंध राहतो, ह्यात सतत बदल असतात. मूळ दृश्यात सापडत नाही, म्हणून त्यावरून संबंध सतत बदलत राहतात.

मग असं असताना "आपण perfect असायला हवे" हे अपेक्षा करणे कितपत योग्य आहे?! 

वृत्ती चंचल असल्यामुळे एकातून अनेक, असे खूप सारे संबंध असतात (जाळ) जे साऱ्या दिशेने आणि साऱ्या स्तरावर पसरतात. भगवंताची किमया आहे, त्याचा परिणाम म्हणजे स्वतःला आपण स्वतंत्र समजतो!! स्वतंत्र संकल्पना हा भ्रम आहे, सत्य नाही. म्हणजे आपली प्रत्येक कृतीला भगवंताचा पाठिंबा आहे आणि प्रत्येक कृती करतांना असंख्य अदृश्य स्तरावरचे आणि दृश्य स्तरावरचे वृत्ती सामावलेले असतात. 

आता भगवंताचा पाठिंबा म्हणल्यावर, सर्व काही स्वतःच्या विचाराच्या संबंधात आलेलं आहे. म्हणून त्यावरून आपण एकटे नसतो, सर्व काही आपण बरोबर घेऊन जात राहतो. आणि दुसरं म्हणजे एकच सत्य अनेकात वावरतांना भासून येतं. 

वरील जाणिवांना एकच क्रिया आहे - श्रद्धा.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home