Thursday, May 23, 2024

श्री

 श्री,


गोष्टी कुठल्या प्रकारे होणे आणि परिवर्तन होत अदृश्य होणे आणि परत उगम पावणे हे भगवंताच्या इच्छेने होत. 

हे जाणवायला सैय्यम हवा, इतका की एकरूप होऊन बदल जाणवणार नाही. 

आपल्या मनात कृती केल्यावर परिणामाचा अट्टाहास असतो. त्याने गोष्टी तश्या होत नाही कारण आकलनाच्या पलीकडे बऱ्याच गोष्टी कृतिवर परिणाम करत आकार घडवतात, जे जीवाच्या हातातच नाही किंव्हा लक्षात येत नाही किंव्हा त्याकडे ध्यान जात नाही किंव्हा ते विचार चक्राच्या सीमेच्या आत नसतं! म्हणून होण्यावर आपण दोष देत राहतो आणि राग राग करतो...म्हणून जे होत त्यावर अनाकलनीय शक्तींवर श्रद्धा ठेवावी कारण त्यां शक्तींना  दैवी स्वरूप असतं, जीवाच्या पलीकडचं. दैवी स्वरूप म्हणजे कायम असणे, कमीतकमी बदल, अति सूक्ष्म आणि सर्वव्यापी.

जे जीव आहे, ते तत्पूर्त आहे, बदलणार आहे, परावलंबन होणार आहे. त्यातून कितीही संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला तरीही तत्पूर्तेपणं कमी होत नाही कारण आपण त्याच चौकटीत (स्तरावर) राहतो.  

भगवंतावर निष्ठा ठेवा, म्हणजे त्याच्याशी संबंध वाढवा. त्यातून समाधानाचा मार्ग आणि क्रिया कळूंन येईल. संबंधाचा मार्ग म्हणजे श्रद्धेचा भाव प्रकट करणे. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home