Friday, May 31, 2024

श्री

 

श्री,

 नामस्मरणाचा अर्थ पूर्णपणे कळणार नाही, म्हणून त्यातील संकल्पनेला विस्तार व्हायला वाव आहे. मन वस्तूला चिकटत. वस्तूचा अर्थ किंव्हा विस्तार मनाच्या स्थितीशी निगडित आहे. वस्तू खूप विस्तारलेली जाणवते जेव्हा स्वतःच मन सूक्ष्म होत. विस्तार म्हणजे सर्वांशी आणि सर्व स्तरांशी संबंध जाणवणे आणि सर्वांचा उगम भगवंतापाशी आहे हे पटणे. स्वतःचा कर्तेपणा मग गळून पडणे, कारण स्वच्या पलीकडे खूप साऱ्या शक्तींचा वावर असतो. त्यांचं अस्तित्व जाणवणे म्हणजे स्वतःच्या वृत्ती शांत करणे.

 ह्यावरून असे कळेल की वृत्ती आणि तिच्या निर्मितीमुळे आपलं लक्ष किंव्हा जाणीव फक्त वस्तुवरच केंद्रित राहते. फक्त वस्तू - म्हणजे बदल, परावलंबन, दूरचा संबंध, अहं वृत्ती, गती, देहबुद्धी, मर्यादित विचार चक्र वगैरे - अशी मनस्थिती. ह्या मनस्थितीत जर आपण विचारांकडे, उगमाकडे आणि स्वतःकडे त्याच नजरेने बघितलं तर प्रवास पूर्ण व्हायला वेळ लागेल. 

 आपण वस्तू आहोत का? आपला संबंध दुसऱ्याशी नसतो का? आणि अश्या प्रकारे संबंध असतो का, की त्याने अहं भक्कम होईल?!!...हे झाले संकुचित विचार. मार्ग शोधण्यालाही मर्यादा येतील, जर आपण त्याकडे पळवाट म्हणून बघितलं तर. भोगाच प्रबोधन, त्याचा उगम आपल्याला ह्या संकुचित मनस्थितीत कळत नाही, पण त्याने त्रासून का जाणे? त्रासाकडे वस्तू म्हणून बघायचं की पलीकडून झालेली क्रिया म्हणून बघायचं? आणि निर्णय देखील कुठल्या पार्श्वभूमीवर करायचा? ह्यात निर्णय म्हणजे वाढती जाणीव होत राहणे असा आहे, फक्त बौद्धिक नाही. साहजिकच की सध्याच्या मनस्थितीत चक्राचा स्वभाव असा आहे की तो त्रास देतो/ निर्माण करतो. 

 ह्याचा अर्थ की चक्राकडे बघण्याची दृष्टी बदलायला हवी.

 हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home