Monday, May 27, 2024

श्री: बुद्धीचा वापर

 श्री: बुद्धीचा वापर


सगळ भगवंताने दिलं आहे, म्हणून मूळ बुद्धीच्या पलीकडे असणार. म्हणजे बुद्धीचा वापर करणे आहे, त्यात गुंतून राहणे नाही. कुठलीही गोष्ट पूर्ण नसते, कारण ती शांतीतून उदयास झाली असते. म्हणजे सर्व गोष्टी, वृत्ती शांतीत विलीन होऊ शकतात. म्हणून गोष्टींच्या निर्मिती बद्दल विचार करत राहणे म्हणजे त्यात गुंतून राहणे, कारण सर्व गोष्टी चक्रात, एकमेकात असतात आणि "निर्माण" क्रियेतून झाल्या असतात. 

हे जर कळलं तर बुद्धीच्या मागे आपण पडणार नाही. अर्धवट सत्य ते आणत राहत किंव्हा जाणिवेचा तात्पुरता रंग देत राहत हे कळेल. 

वृत्ती शांत करणे हा हेतू आहे. म्हणून बुद्धीची शक्ती त्यासाठी वापरणे. म्हणजे दृश्याचा कुठल्याही घडामोडींना बौद्धिक उत्तरं न शोधणे आणि त्यावरून उगाचच स्वतःला दोषी ठरवणे किंव्हा चिंतेत राहणे हे सर्व प्रकार बंद करणे. 

तिसरी गोष्ट अशी की प्रतिक्रिया विचारपूर्वक शांत मनाने देणे. ही सवय करता येते. दुसऱ्या व्यक्तीला राग आला किंव्हा त्रास झाला तर बौद्धिक विचार करून योग्य ते कार्य करणे. राग किंव्हा त्रास हे जिवाचं लक्षण आहे. विचार करून शांततेत कार्य करणे हे विवेक शक्तीच लक्षण आहे. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home