Friday, May 24, 2024

श्री: प्रवास

 श्री: प्रवास


प्रवास. कधी, कुठे, कसं घडतं राहील, तो योजिला आहे. खूप सूक्ष्म आणि गूढ पद्धतीतून हालचाली होत असतील आणि आपल्या जगाची स्थिती त्यातून निर्माण होत असावी. 

परिवर्तन होईल, कारण तो नियम आहे. ज्याला आपण चिंतेत राहतो किंव्हा विषय मांडतो, तो ह्या करिता असतो की त्यातून अनंत हालचाली कळून यावेत. तो विषय असण्याच प्रबोधन आहे. जेव्हा कोडी सुटायचे असतील, तेव्हा सुटतील, ह्या जन्मात किंव्हा नंतरच्या किंव्हा वेगळ्या स्तरावर. त्यावर श्रद्धा ठेवावी. अस्तीत्व अनेक स्तरावरच असतं आणि संबंधित राहत. तो संबंध कसा असतो, त्याच आकलन व्हायला सैय्यम ठेवायला लागतो. 

आपण खूप साऱ्या स्तरावरून झालो आहोत, जोडले गेलो आहोत, म्हणून शांत राहावं. शांत ह्यासाठी की वेळ आल्यावर गोष्टी समजतात - ह्यावर, ह्या संकल्पनेवर श्रद्धा वाढवावी. आपल्याकडे काय आहे आणि काय नाही, त्यातून स्वतःच मोजमाप करू नये. त्यावरून मोजमाप ठरतं नाही. 

एखादी गोष्ट, चिंतेचा विषय असेल, तर ती सोडवण्याचा अट्टाहास धरू नये. ती तशी राहू द्यावी. गुंता आपोआप सुटेल, कारण गुंता मनात असतो. म्हणून अस्थिर गोष्टींकडे चिंतेच्या भावनेत बघू नये - ते आपलच अस्तित्वाचं प्रतिबिंब आहे, म्हणून शांत राहावं. 

शांत हा मोठ्ठा अर्थ आहे. पुर्ण सार त्यात आहे. सर्व वेगळेपणा, जो आपल्याला वाटतो आणि जो आपण स्थिर करण्याचा प्रयत्न करतो - तसं करू नये. बळजबरी काही उपयोगी नाही. काहीही वाटलं, तरी ते शांततेत विलीन होईल - ते कधी, कुठे, कसं...ह्यावर विचार न करणे. 

प्रवास हा अनंत काळाचा आहे. सैय्यम ठेवा.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home