Monday, May 27, 2024

श्री

 श्री,


भगवंताला स्वतःला अनेकात बघायचं असतं, म्हणून अनेक वृत्ती आणि आकार निर्मितीला येतात. शक्ती अशी आहे की त्यात द्वैत निर्माण करण्याची कला आहे आणि त्यातून परत एकात येण्याचं प्रबोधन आहे. म्हणजे द्वैत आल की अतृपत्तपणा उदयास आला,  शोध सुरू झाला आणि शेवट विलिनता मध्ये झालं. द्वैत ही भावना आहे. तसच अद्वैत ही समाधानाची भावना आहे. दोन्ही गोष्टी जाणिवेतून होत राहतात. म्हणून दोन्ही गोष्टी दैवी संपत्तीतून आलेल्या आहेत, त्यात स्वतःच सरमिसळ करण्याची गरज कुठे?!..

वेगळा झालो की आकार दिसून येतात, संकल्पना उदयास पावतात आणि तात्पुरतेपणा आला. ही सर्व क्रिया घडते भगवांतकडून. आपण वेगळेपणाने जगाकडे बघतो. बाहेर आणणे ही खुमखुमी वाहत असते आतून. आणि ती खुमखुमी जग दाखवते. बाहेर येताना ती भगवंताहून "वेगळी" होते - म्हणजे वृत्ती, प्राण आणि आकार उदयास येतात (सर्व स्थिती). शक्तीच सत्य रूप बदलत आणि त्याला रंग येतात.  

उर्ध्वगत होणे म्हणजे वरील क्रिया स्थिर करणे. वेगळेपणा ओलांडून भाव हा सत्याचा होतो - अद्वैत. म्हणजे सर्व ठिकाणी एकच अस्तीत्व आहे, ते सांगायला सुद्धा मी राहत नाही!

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home