श्री
श्री,
अभ्यासाचा हेतू ह्या प्रमाणे असावा:
जीव म्हणजे काय? त्यात होण्याची क्रिया आहे. स्वतःच अस्तीत्व जाणवणे म्हणजे एक निर्मितीची क्रिया दर्शवते आणि त्यातून " मी " होत राहतो. भगवंत अंतिम सत्य मानला तर आपल्या कारकिर्दीला कितपत महत्व द्यावे हे जीवाने स्वतःच्या अनुभवावरून ठरवावे. निर्मिती होणे म्हणजे अद्वैतातून द्वैताच्या अनेक स्थितीत वावरत राहणे. द्वैताच्या उलट (किंव्हा द्वारे) आद्वैतानुभव घेण्याची शक्यता असते. आणि हाच संबंध श्रद्धेने प्रज्वलित होतो.
क्रिया होतांना, प्रत्येक स्तराचे त्याचे त्याचे परिणाम किंव्हा विचार चक्र निर्माण होत असतात आणि ते हेतू आणि कार्य घडवतात. प्रत्येक स्तर हे भगवंताच्या शुध्द शक्तीचे वेगळे रूप आहे (परिवर्तन आहे/ परावलंबी स्थिती आहे/ द्वैत आहे/ आकार आहे/ संबंध आहे/ बदल आहे).
सर्वात स्थूल किंव्हा दृश्यात येणारी शक्ती म्हणजे " जीव ". ह्याचा अर्थ असा की जीवाच वर्तन एका शक्ती चक्रातून होत राहत, ज्याला त्या अनुभवाला " मी " ग्राह्य धरतो.
मग तसं पटल्यास, कुठल्याही प्रकारची वृत्ती असली ( शक्ती चक्र ), ती विचार शरणी, भावना आणि अर्थ स्वतः भोवती केंद्रित करते आणि देत राहते. An *_exchange_* of energy fields or *_interactions_* of different vibrations happen.
ह्या प्रक्रियेला "अहं किंव्हा स्वार्थी असणे" असं म्हणतात. जो पर्यंत अस्तित्वाची क्रिया जाणवत नाही, तो पर्यंत ह्या शक्ती चक्राचा परिणाम आपल्या मनावर खूप खोल राहतो, आणि आपण सुख दुःख भोगतो. मन हे शक्तिरुप आहे, पण सध्या ते विशिष्ट पद्धतीने वावरत राहत, म्हणून तसे अनुभव आपल्या पदरी निर्माण होतात.
वरील गोष्टींची जशी स्पष्टता येते, तशी आपल्याला भगवंताची ( शुध्द होण्याची ) गरज वाढत जाते आणि मग महत्वाचा प्रवास सुरू होतो.
त्यावरून सैय्यम आणि श्रद्धेचे महत्व प्रज्वलित होत राहत.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home