श्री
श्री,
गोष्टींचं उद्भवणे हे जीवाच्या पलीकडील रहस्य आहे. "उद्भवणें" हे कार्य आहे, शांत हेतू मधून साकार झालेलं आहे. काय उद्भवते? शक्तीची क्रिया - वृत्ती, प्राण, आकार आणि ते होतांना अनेक स्तर, संबंध, जाणीवा, अनुभव, बदल.
भगवंताचा पूर्ण स्वभाव पहिला तर अदृश्य आणि दृश्य हे दोन्ही त्यात सामावलेले घटक आहे. दृश्य वेगळं, आणि अदृश्य वेगळं, हे समजून घेण्यासाठी ठीक आहे, पण सत्य एकच आहे आणि हा सर्व खेळ (किंव्हा क्रिया) त्याचा विलास आहे. तो आहे, म्हणून दृश्य जगाची निर्मिती आहे, किंबहुना त्याच्या शिवाय दृश्य जगाला अस्तीत्व नाही.
सूर्य म्हणलं तर सावली आली, तसेच भगवंत म्हणलं तर दृश्य आलच. आणि जशी सावली वरून सूर्याचं अस्तीत्व आपण पारखु शकतो, तसेच दृश्याचा क्रियेवरून भगवंताच्या अस्तित्वाला जाणून घेऊ शकतो.
प्रश्न बोचणारे असतात. भगवंत जाणून घेण्याची ती किम्मत असावी. सर्व गोष्टी सोडण्याची तैय्यारी हवी, ती दाखवावी, म्हणजे भगवंत प्रकट होतो. आपण दृश्य जग सोडत नाही, कारण त्याचा आधार आहे, अशी समजूत झाली आहे. हे सांगणे सोप्पे आहे, पण प्रकरण वस्तुतः खूप गूढ आणि गुंतागुंतीच आहे. कितीही स्पष्टीकरण देता येऊ शकलं, तरीही आपण दृश्य स्वभाव सोडू की नाही हे श्रद्धेने शक्य होऊ शकेल.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home