श्री,
विचार एका प्रकारे निर्माण झालेली गोष्ट आहे, कुठल्याही इतर वस्तू सारखी. निर्मिती म्हणजे ज्याचा उगम भगवंत ठरवतो, त्याच्या शक्तीच रूपांतर होत एखादा गुण घेऊन आणि इतर
सर्व गुणान बरोबर त्याचा संबंध राहतो. म्हणजे एकाच वेळेला स्वतंत्रपणे अहं
वृत्तीचा भाव असते आणि त्याच्या पलीकडची विशाल संबंधांची जाणीवही असते. या दोघा
भावनेतून आकारास कुठलीही वस्तू येते. म्हणजे जिवामध्ये जो अनुभव निर्माण होत राहतो
त्यात ह्या दोन प्रकारच्या भावना मिसळलेल्या असतात - स्वतः काहीतरी करणे आणि शांत
होत राहणे.
आता हे कुणी ठरवलं? असं घडणे आणि
निर्मितीला येणे आणि कार्य करणे आणि विश्वाचा भाव जाणवणे हे कुणी ठरवले? निर्मितीच्या वस्तूंना हे कोडं माहीत नाही त्यांचे
गुण बघितल्यास, पण त्या गुणांच्या
मार्गातून शांत होण्याची प्रक्रिया वस्तू किंव्हा जीव घेऊ शकते. त्यात "मोकळी
जागा" अनुभवास येते आणि ती सर्व ठिकाणी पसरलेली आहे हे दिसून येत. आपण ज्याला
अनुभव म्हणतो, तो सध्या निर्मिती
मधून उदयास आलेला आहे. म्हणून तो कायम नाही, बदलणारा आहे आणि इतर सर्वात गुंतलेला आहे. हा अनुभवाचा किंव्हा विश्व भावनेचा
गुण धर्म आहे. म्हणून त्या अनुभवाचे घटक - म्हणजे वृत्ती, विचार, भावना आणि शरीर उदयास येतं राहतात. शक्तीच रूपांतर होणे आहे आणि त्याचा
परिणामही आहे ( किंव्हा त्याचच कार्य आहे असं म्हणायला हरकत नाही).
आता गफलत अशी होते आपल्या समजुतीत की ह्या साऱ्या प्रक्रियेला आपण
"मी" समजतो. तसा भाव उत्तेजीत ठेवतो. म्हणून ती भगवंताची इच्छा न समजता, आपण स्वताच्या अस्तित्वाची काळजी करत राहतो आणि
बदलांना घाबरतो. त्यातून अट्टाहास, ताबा, राग अश्या भावना निर्माण करतो! ते नाहीसे करण्यासाठी
अजून गुंतून राहतो आणि प्रपंच काही संपत नाही. जनमो जन्मी तीच गत राहते आपल्या
वृत्तीत!
म्हणून भगवंताची जाणिव वाढवण्यास सर्वात मोठा निर्णय आहे. त्या शक्तीच जागे
होणे आहे स्वतःच्या जाणिवेतून. आणि त्यातून प्रवासाचा खऱ्या अर्थाने आरंभ आहे.
अशी जागे होण्याची स्थिती कधीतरी येते. परिस्थिती महत्वाची नाही. जागे होणे
आहे. आणि मग अनुभव कसाही
असो, आणि कुठल्याही
आकारात साकार हो, तो भगवंताच्या
इच्छेमुळे आला आहे आणि तो त्याच्याकडे नेणार आहे, अशी श्रद्धा वाढत राहते. पुढे, आता, मागे हे साऱ्या गोष्टी असणार, कारण त्यातून शांतीची वाट रचली आहे.
वास्तुशास्त्र मध्ये, transition and
continuity, या संकल्पाना महत्व दिलं जातं. कुठलीही गोष्ट स्वतंत्र बघण्यापेक्षा एकातूनेक
निर्माण झालेली आणि पुढे नेणारी जाणून घेणे. इथे मतितार्थ आहे व्यक्ती रेखाटनेचा, भवतालच्या साऱ्या वातावरणाचा, इतिहास ते संस्कृती ते भविष्याचा, मानवाचा, सर्व जीवांचा, निसर्गाचा वगैरे. हे
घटक वेगळे किंव्हा स्वतंत्र नाही. एवढ जरी अत्मसाद केलं तरी कलाकृती करुणाने
भरलेली दिसून येईल/ जाणवेल.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home