श्री
श्री,
शक्ती म्हणजे निर्मिती आणि निर्मिती मध्ये जाणीवा, बुद्धी, भावना आणि आकार आले - त्यांचेही स्तर आले (सूक्ष्म ते स्थूल) आणि प्रत्येक स्तरात "मी" ची त्या प्रमाणे _भावना_ आली.
म्हणजे "जीव" होण्याची क्रिया दर्शवणे हे शक्तीच कार्य आहे आणि भगवंताची जाणीव होत त्याच्या पर्यंत पोहोचणे हा झाला आपला प्रवास (शक्तीच परत शुध्द स्वरूप जागं करणे).
ज्या गुणांना (किंव्हा त्यांच्यामुळे) "मी" होतो, त्यांना मी खरं मानतो म्हणून सत्याला त्या गुणानपासून निराळं बघू शकत नाही. म्हणजे माझ्यावर गुणांचा खोल परिणाम होत राहतो, त्या शक्ती चक्राचा परिणाम. त्याचा परिणाम म्हणजे द्वैत्मय जग, अनुभव, बदल, गती, सुख दुःख वगैरे. हे त्या शक्तीचा स्तरांमुळे होणारे "अनुभव चक्र" आहेत. अनुभवही एका स्तराची जाणिव आहे. सर्व ह्या अनुभवांना आपण _अहं_ म्हणतो - वागण्याची सवय किंव्हा पद्धत किंव्हा स्वभाव.
आपल्याकडे पर्याय नाही, पण शुध्द होत राहणे हाच उपाय आहे. प्रत्येक अनुभव प्रवास मानला, तर त्याचा शेवट भगवंत आहे, हे जाणून घेणे. गोष्टी एकातएक घडतात (unfolding) आणि ते होणे कुठल्याही पद्धतीने आणि तसं होऊ देणे, कारण तिचं भगवंताची इच्छा आहे, असे समजणे.
अनुभव स्वतंत्र जरी वाटला जीवाला तर तसा तो नसतो. परिस्थिती, व्यक्ती, वस्तू ह्या संकल्पना विस्तारलेल्या आहेत - त्याच प्रमाणे अनुभव. तो स्वतंत्र नसतो म्हणून बऱ्याच गोष्टी तो दर्शवतो आणि तो विशाल होऊ शकतो, सूक्ष्म स्तर जाणून घेऊ शकतो, सर्व जीवांना एकत्रित बघू शकतो. म्हणजे अनुभव किती विशाल करायचा आहे, ते जीवावर आहे - प्रत्येक जीवात ती क्षमता आहे. त्या क्षमतेला जागं होण्याची गरज आहे.
Man (which means any experience) is a measure of things. The expanse of experience should keep increasing.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home