श्री
श्री
साहजिक आहे की एक रूप घेऊन, एक गुण घेऊन, आपल्याला अनेक आकारात, शक्तींच्या समूहात, दृश्यात गुंतायला लागतं. तो नियम आहे जगाचा. त्या नियमाच कारणही वृत्तीतून उद्भवत जो भगवंताने मांडलेला आहे किंव्हा त्याची इच्छा आहे. हे गुंतणे, आकार बघणे, गतिमान होणे, बदल दिसणे, अपूर्णे वाटणे, तत्पुरत अनुभवणे - एका प्रकारचं कार्य आहे, ज्याची सुरुवात आणि शेवट जीवाच्या आकलनाच्या पलीकडे असते.
शुध्द होणे म्हणजे वरील क्रियेच्या परिणामाकडे बघून देखील जाणीव वाढवत राहणे. अस्तित्वाची परिस्थिती काहीही हो विचार आणि भावनांच्या पातळीवर, भगवंत जाणता येतो. म्हणून परिस्थितीवर जास्ती विचार किंव्हा चिंता करत जाऊ नये - एका प्रकारे गोष्टीचा चावा घेण्या सारखे आहे. त्यातून काय मिळणार? समाधान तर नाहीच!
भगवंताचे स्मरण आणि त्याचे कार्य हे जाणणे समाधानी स्थिती पर्यंत नेईल. भगवंताकडे विषय किंव्हा वस्तू अश्या दृष्टीने बघू नये, मग तो जाणिवेत येत नाही. विषय सोडले किंव्हा वस्तूंचा अट्टाहास सोडला तर तो साध्य होतो. "पलीकडे" होणे ह्याला संबोधित केलं आहे. ह्याच्यात एक *भाव* अभिप्रेत आहे - जाणिवेतून.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home