श्री
श्री
वस्तू समजून घेणे हे तेव्हाच शक्य होत जेव्हा आपण दृश्याचा स्वभाव धारण करतो. म्हणजे सुख दुःख भोगतो त्या स्वभावामुळे. आपण गुंतून राहतो. गुंतणे ही वृत्ती आहे आणि कितीही त्यात धडपड केली तरी पूर्ण समाधान त्या वृत्तीतून मिळत नाही.
तरीही ही सृष्टी, गती, गुण, वृत्ती, परावलंबन गूढ शक्ती मधून निर्माण झालेलं आहे ज्यात आपणही होतो, वावरतो, गुंततो आणि अनुभवतो. हा शक्तीचा परिणाम आहे, तो झेलायला लागणारच. शक्ती ही दैवी क्रिया आहे, भगवंताची इच्छा आहे, म्हणून त्यात दृश्याच स्थान राहणार.
दृश्य भगवंताची आठवण करून देऊ शकत. जो बाहेरील प्रकार आहे भगवंताचा, तो म्हणजे दृश्य आणि त्यातले अनेक स्तर. जसे आपण अंतर्मुख होऊ, तसा भगवंत जाणवायला लागतो.
आज काल आपण लोकं खूप आवाजात वावरतो. अती परावलंबी संकल्पना त्रास देते. उतावळेपणा करून, काहीतरी दाखवून काय मिळणार आहे स्वतःला, हे विचारणे. तो मार्ग योग्य नसेल तर सोडून द्यावा. वस्तूच्या मागे लागलो, तर तसेच गुण आपण धारण करतो.
तसे व्हायचं नसेल तर भगवंताची आठवण करा. आठवण म्हणजे खूप सूक्ष्म होण्याची क्रिया, तो फक्त शब्द नाही. गोष्टींचं होणे, असणे, जाणे, बदलणे ही त्याची इच्छा आहे, त्याच कार्य आहे. म्हणून सतत भगवंत असतोच सर्व गोष्टींच्या पाठीमागे. बुद्धीच्या तर्काने गोष्टींचं मूळ " जाणवत " नाही, कारण सूक्ष्म जाणीव बुद्धीच्या पलीकडे असते. म्हणून त्यासाठी जाणीवा सूक्ष्म व्हायला लागतात. ते झाले की बुद्धीला प्रतिभा शक्ती मिळते.
हरि ओम.
श्री
आपण देवावर श्रद्धा ठेवू, की तोच करता आहे आणि योग्यच गोष्टी घडवून आणतो. आपल्याला मूळ माहीत नाही, आपण चिंतेत असतो, मी करता आहे असे समजतो. ही विचार शरणी आहे. ती योग्य नाही कारण त्यात आपल्याला त्रास होतो. दृश्याचे परिणाम असतात, त्यात वावरून ताबा मिळवणे हा हेतू नसावा मनाचा. सर्व निर्मिती आहे, तर कसला ताबा मिळवणार?! दृश्यात भगवंताला ओळखणे हे आपलं ध्येय आहे. Realization.
सर्व गोष्टी पलीकडून आलेल्या असतात आणि गुंतलेल्या देखील. जे येत दृश्यात, त्याला निर्माण करणारी शक्ती भगवंताची आहे, म्हणून सर्वांच्या मुळाशी *तो* आहे. असे का आणि तसे का, ह्यात पडू नये. सध्या विखुरले पणा खूप असेल तर राहू दे. आपले कर्तव्य करावे आणि भगवंताला सोपवावे. भगवंताला धरून ठेवण्याचा प्रवास प्रत्येकाचा निराळा आहे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home