श्री
श्री
अस्तित्वाचं कार्य सर्व ठिकाणे आहे, हे ध्यानात ठेवायला लागतं. अस्तित्वाचं परिणाम ओळखावा लागतो. द्वैतमय जग निर्माण होत राहणे आणि त्यात आपण स्वतःचा अर्थ मांडणे हा एक परिणाम आहे.
अर्थ मांडताना स्वतःची जाणिव कारणीभूत आहे, हे जाणणे. अर्थ लावताना अनेक संबंधित घटक सामावलेले आणि बदलते आहेत, हे जाणणे - म्हणजे आपण परावलंबी आहोत. त्या परावलंबी राहण्याचा परिणाम म्हणजे एका प्रकारचं विचार चक्र आणि भावना चक्र. त्यातून उमटणार अहं भाव किंव्हा माझे पणा. त्या अहं भावतून निर्माण होणारे अनुभव - जे सतत गुंतागुंती, बदल, तत्पुर्तेपण आणि न्युन भावना निर्माण करतात. त्या भावनेतून दिसणारे आकार, संबंध, परिस्थिती आणि त्यावरून आपली कृती किंव्हा न थांबणारी धावपळ.
हे सगळं अस्तीत्व किंव्हा दृश्यच असणे (किंव्हा भासणे) मनात किंव्हा जाणिवेत चालू असतं. बाहेरील स्थितीच अस्तीत्व किंव्हा वावर किंव्हा स्वभाव किंव्हा परिणाम किंव्हा आकार हे सर्वस्वी आतील जणीवेशी संबंधित असतं. प्रत्येक जीवाचा अर्थ तो त्याच्या रचने प्रमाणे निर्माण करत राहतो. तरीही मानवी जीव ही एकच स्थिती आहे (अहं वृत्तीची किंव्हा भीतीची) जिचे असंख्य पद्धतीने अपुरे अर्थ निर्माण होत राहतात आणि म्हणून एकमेकात आपण गुंतून राहतो.
वरील सर्वस्वी भगवंताच्या शक्तीचा परिणाम आहे. तो परिणाम इतक्या सूक्ष्म पातळीपासून घडतो की दृश्यात येई पर्यंत " आपण " ही संकल्पना निर्माण होते आणि पूर्णपणे भगवंत स्थितीला विसरायला होत! भगवंत कायम आहेच, म्हणून त्याच्यातून निर्माण होणारे आणि परिणाम करणारे चक्र देखील कायम राहतात. म्हणून दृश्यात सुरुवात आणि शेवट कळत नाही, तो शोधण्याचाही प्रयत्न बुद्धीचा लटका पडतो. तिथे श्रद्धेचा जन्म होतो.
श्रद्धेच्या बळावर भगवंताचे अस्तीत्व निर्माण होत, त्याच्या शक्तीच कार्य कळत, आपण सूक्ष्म होत जातो आणि शेवटी भगवतस्वरुप होतो. हा प्रवास मानवी जीवाला दिला आहे. तसे होत जाणार, ती खात्री बाळगावी.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home