श्री: शांत होणे
श्री: शांत होणे
घाई करून चालत नाही. मन अनेक वृत्ती निर्माण करत आणि इथे + तिथे धडपड करायचा अट्टाहास धरतं. मन ही शक्ती आहे, आणि एका प्रकारच्या जाणिवेतून हा परिणाम निर्माण होतो.
तरीही घाई करून उपयोगाचं नाही, कारण ज्याचा शोध आहे, जो मोलाचा अनुभव आहे, तो दृश्याच्या परिणामांशी निगडित नाही आहे. त्यावरून शांती भावाची व्याख्या पूर्ण अवलंबून नाही. हे स्वाभाविक आहे. त्यामुळे शोध ही गरज निर्माण होते जीवाची. शोध हे अट्टाहासाने होतो का?! नैसर्गिक प्रक्रिया ही की जेव्हा होईल शांती भावाची प्रचिती तेव्हाच होईल.
स्वतः बद्दल विचार केला कि जाणवत कि आपल्या कृतीवर, हेतूवर, वृत्तीवर काहीही ठरवू नये. दृश्य दिसत, परिस्थिती येते, लोकं वागतात, ते बोलतात, ते प्रक्रिया देतात, आपण काहीतरी सांगतो, काहीतरी मांडतो, काहीतरी कार्य करतो – हे कुणावर ही (आणि स्वतःवर ही) अवलंबून मानण्याची गरज नाही. मुळात कुठल्याच अश्या निर्माण होणाऱ्या गोष्टींवर सुरुवात किव्हा शेवट बघू नये (किव्हा तसे विचार आणल्याची गरज का असावी?!). सुरुवात किव्हा शेवट मानणे आणि त्याचा ध्यास घेणे हे खूप दुखला कारण बनू शकत. बुद्धीची वागणूक अशी आहे कि ते सुरुवात शोधण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्या चक्रात आपण वावरत राहिलो तर सुटका नाही. “मूळ” शोधणे किव्हा होणे किव्हा अनुभवणे हे “सुरुवात” संकल्पना पेक्षा वेगळ आहे. मूळ होतांना आपण शांत होतो, विशाल होतो, स्थिरावतो. तसा भाव सुरुवात शोधतांना मिळत नाही.
म्हणून वृत्ती कुठे चिकटते आणि सारखी मनाला आठवण करत लावते, ते बघावे. ती वृत्ती, त्या संकल्पनेतून काढून भगवंताला अर्पण करा किव्हा वृत्तीला शांत करा. मुख्यतः वृत्ती “ मी” ह्या संकल्पनेला चिकटून राहते म्हणून जन्म, मरण, जीवन ह्याची शाश्वती मिळत नाही आणि भीती वाटते आणि काहीही केल्या ती भीती काही जात नाही. हे मान्य करणे पाहिलं. दुसरी गोष्ट कि त्या भीती बद्दल, जी इतकी सूक्ष्म आहे, ती इतरांना सांगता हि येत नाही पूर्णपणे. म्हणजे ती “निर्माण” झालेली वस्तू आहे, जिच्यात बदल, गुंतागुंती, चंचलपणा राहणार.
प्रकरण अस आहे कि वृत्ती शांत होऊ देणे. त्याचे अनेक मार्ग असावेत. त्याच्या अगोदर स्वतःला पूर्णपणे स्वीकारा दोष न देता. स्वतःला स्वीकारा यात सर्व जगाला स्वीकारा हे ओघाने आलच. म्हणजे सर्व अस्तित्वाच्या घडामोडी, स्तर, स्थिती, विचार, भावना, अर्थ, संबंध, कार्य – ह्यांना असू देणे. माझा प्रवास, अनुभव, क्रिया, संबंध – ह्या सर्व गोष्टी होत राहणार – त्यातून perfect होण्याची संकल्पना ठरत नाही/ ठरत नसते. प्रवास, अपेक्षा, नाती, संबंध, क्रिया, काम - कसल्याच गोष्टींची काळजी असू नये/ विषय मानु नये. कुठली गोष्ट कुठल्या रुपात होईल, काय घेऊन येईल, काय दाखवेल आणि काय घडेल आपल्या वावरण्यामुळे - हे सर्वस्वी भगवंताला सोपवणे आणि आपण शांत राहणे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home