श्री
श्री
एखादी जाणीव अशी का यावी किंव्हा तैय्यार व्हावी, हा माझ्यासाठी बौद्धिक प्रश्न जरी असला, तरीही ही पलीकडून आली आहे, हे स्वीकारण्याची सवय करणे शहाणपणाचे ठरेल. म्हणजे जाणीव काहीही असो आणि त्याच्यामुळे परिणाम चक्र काहीही ठरो, तरी त्रासून घेण्याची गरज नाही. जाणीव आपण ठरवतो का ती होते, हे समजून घेणे. जाणीव माध्यम काय निर्माण करते आणि कसे हे ओळखणे. त्याला प्रवास मानणे आणि म्हणून सतत बदलत राहणे हे स्वीकारणे.
एकंदरीत ज्या काही असंख्य गोष्टी निर्माण होतात, किंव्हा आकारात येत राहतात, त्या मागे भगवंताचे प्रबोधन असते. ते भगवंताचे कार्य आहे. त्यात आपली जाणीव काम करते. इथे काम म्हणजे खऱ्या असणाऱ्या वस्तूंची संकल्पना आणि परिणाम. ते म्हणजे काम किंव्हा कृती किंव्हा कार्य.
हरि ओम
0 Comments:
Post a Comment
<< Home