Friday, July 05, 2024

चक्र

चक्र हे सगळ्यांच्या वाट्याला आहे. ते समजून घेत असताना मला जाणवलेले गोष्टी अश्या आहेत:

१. भगवंताच नामस्मरण, त्याचा विचार, भावना, कार्य, हेतू ह्या बद्दल सतत चिंतन करत राहायला लागत...एका प्रकारे संस्कार मानायला हरकत नाही. ते चिंतन अनेक स्थितीत नेईल, दुःख ही देईल, त्रासही होईल, पण ते करत राहणे गरजेचं आहे - त्यातूनच चक्राचा परिणाम ढिला होत जाईल. तो परिणाम कसा, कधी, केव्हा होईल - तसा प्रश्न येणे स्वाभाविक आहे, पण त्याने नामस्मरणाची क्रिया थांबण्याची गरज नाही. ती क्रिया करत राहणे.
२. नामस्मरणाचा अर्थ जो असेल, जो कळून घेतला असेल, त्याने पुढे जात राहणे. कारण सततच्या संस्कारामुळे अर्थाचा विस्तार होत जातो. 
३. स्वतःवर कधीही अविश्वास दाखवू नये. आपण अपुरे आहोत मान्य आहे, पण तरीही भगवंताची इच्छा बाळगून आलो आहे, हे नक्की. कुणावर हक्क गाजवण्याची गरज नाही किंव्हा सर्व खोटं आहे, म्हणून त्रासून किंव्हा नयुंन पत्करून घेण्याचीही गरज नाही. जे आहे, त्यात आनंद मानणे आणि अशी परिस्थिती का आली आहे, ह्याने त्रासून न घेणे.
४. तुलना जरी वाटली करायची, तरीही त्यात गुंतून न घेणे, कारण दृश्याचा परिणाम, तुलना, परवलंबन असणे - ह्या गोष्टी बदलणाऱ्या आहेत. आणि हे स्वीकारून घेणे. 
५. आपण एका पद्धतीने विचार शक्ती दर्शवतो. ते चुकीचं अजिबात नहीं. जे वाटतं, ते वाटतं. त्यात भगवंताचे चिंतन मिसळून घ्या. 
६. प्रत्येकाला भगवंत वेगळ्या पद्धतीने भेटणार आहे हे नक्की. म्हणून सैय्यम ठेवा आणि श्रद्धेने कार्य करा. 
७. आपल्या मनात भीती किंव्हा अहं वृत्ती का आहे, ह्याची काळजी जरी वाटली, तरी त्रास न करून घेणे. हे विधिलिखित आहे आणि त्यातून मार्गाची व्याख्या रेखाटली जाणार आहे.
८. भोगाला अजिबात टाळू नये. जे आहे, ते आहे. भगवंताची इच्छा मानणे .

0 Comments:

Post a Comment

<< Home