श्री: चौकट
मुळ शोधू नये – त्याने त्रास पदरात पडेल बुद्धीच्या तर्काने. गोष्टी अश्या का
होतात आणि कुठल्या स्वरुपात, आकारात, स्वभावात, गुण धर्म घेऊन “येतात, वारतात आणि
बदलतात” हि दैवी शक्ती आहे, त्यात जीवाच काही कर्तृत्व नाही. म्हणून
स्वतःची जाणीव दैवी स्थितीची करायला लागते. दैवी स्थितीचा हेतू आणि कार्य खूप
वेगळ्या पद्धतीने अस्तित्वात असत, जीवाच्या तुलनेने. म्हणून ती शक्ती काय आहे,
कुठला भाव घेऊन साकारलेली आहे, काय कार्य करते, इच्छा काय असावी त्या शक्तीची – हे
प्रश्न जाणीव वाढवत उत्तर मिळतात. जाणीव वाढवण्याच कार्य असं आहे कि सर्व
स्वीकारणे. पळून जाण्याची गरज नाही किव्हा चौकट असण्याची गरज नाही. कार्यात,
व्यक्तीत, वृत्तीत, स्थितीत, आपण चौकट निर्माण करतो, निर्माण करतो आणि तसे वावरतो.
चौकट होणे होत असावं. त्यातूनच संबंध, गती, येणे आणि जाणे होत राहत. म्हणजे सर्व
एकच आहे आणि बदलत राहणार आहे हे निश्चित.
आता जाणीव अशी होत जायला हवी कि चौकट निर्माण करतो म्हणजे कुठल्या हेतूने
करतो? त्याने काय होत? आपला स्वभाव चौकटीमुळे कसा घडतो? त्यातून कळेल कि चौकट टाकून
देण्याची गरज आहे. मी हि चौकट आहे – ती गरजेची आहे का? म्हणून सर्वांवर निरतिशय
प्रेम कराव आणि सर्व गोष्टी, वृत्ती, परिस्थिती, कार्य स्वीकाराव्या. सर्व काळ आणि
स्थळ स्वीकाराव्या. सर्व आपलाच आहे. सर्व प्रवास हालचालीचा आहे, सर्व प्रवास
शांततेकडे होणारा आहे – भगवंत दाखवणारा आहे.
हि एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी कि स्पष्टीकरण देणे म्हणजे त्या भूमिकेत शिरणे –
त्याचा परिणाम असतो. तो करावा कि नाही, हा प्रश्न आहे. बोलून, स्पष्टीकरण देऊन,
आपण तीच वृत्ती होतो. म्हणून काय बोलाव आणि विचार करावा हे ध्यानात ठेवावे. आणि
शेवटच कि सर्व गोष्टी बुद्धीच्या दृष्टीने “चक्रात” वावरतात म्हणून बोलण्याला काही
समाधानकारक अंत मिळेल असे काही सांगता येत नाही! हे कळले कि समाधान आपण होतो – आपण
बोलू किव्हा नाही बोलू! समाधान कुठल्याही परावलंबी संकल्पनेला धरून नसते.
चक्र मनात असत आणि ते भगवंताकडून निर्माण होत, परिणाम होत, वृत्तीतून ते
बुद्धी पर्यंत येत आणि क्रिया घडवत. ते थांबवता येत नाही आणि कदाचित थांबवू हि
नये. म्हणून चक्र शांत करणे हे अध्यात्माच ध्येय आहे/ परिणाम आहे. आपण भगवंताच्या
सानिध्यात आहोत किव्हा त्याच्याच घरी वावरत आहोत हे शांत होऊ जाणवत.
हरी ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home