Saturday, July 06, 2024

श्री

श्री 

अस्तीत्व म्हणजे क्रिया. 

ती क्रिया शुध्द शक्तितून ते वृत्ती ते अनेक बुद्धी ते भावना ते आकार असं एका दृष्टीतून समजून घेऊ शकतो. हे अस्तित्वाचं परिवर्तित होणार स्वरूप आहे. जसं ते परिवर्तित होत, तसे वेग वेगळे स्थिती जगाचे दृष्टीस किंव्हा अनुभवास येत राहतात, जे एकमेकात मिसळलेले असतात. म्हणून ह्याने दोन गोष्टी कळतात - एक म्हणजे जग दिसणे ही गूढ क्रिया आहे जी शुध्द शक्ती मुळे "निर्माण" होते आणि दुसरं असं की त्या निर्मितीचा परिणाम होत राहणे म्हणजे द्वैताचा पसारा.

तीच क्रिया जेव्हा द्वैत दाखवते तेव्हा "मी" अशी क्रियाही प्रचीतिला आणते - म्हणजे आपण अनेक प्रकारे त्या क्रियेत गुंतून राहतो - विचार आणि भावनांच्या माध्यमातून. म्हणून आकार हे फक्त लांबी आणि रुंदी न राहता, त्याच्या बरोबर विचारांची आणि भावनांची देवाणघेवाण होते - म्हणजे आकारात अस्तित्वाचे गुण येतात जे गुण आपण विचार, भावना, शक्ती, बदल, परिणाम ह्या पद्धतीने अनुभवतो. 

त्या क्रियेचा परिणाम असाही आहे की स्मरणाची व्याख्या बदलत राहणे आणि स्थितीवर निर्भर राहणे. त्या स्वभावाला सूक्ष्म ते स्थूल असे संबोधले गेले आहे. सूक्ष्म स्तरात आपण अद्वैत भगवंत "होतो" आणि स्थुलात वेगळेपण अनुभवतो ज्यात अहं वृत्तीचा अंमल होतो. एका स्थितीत असणे प्रामुख्याने म्हणजे दुसरी स्थिती सोडून देणे. 

ह्या सर्व वरील व्यक्तिरेखाचे स्पष्टीकरण करतांना असे दिसते की अस्तीत्व ओळखणे ह्यात अनेक गुंतागुंतीचे प्रयत्न आहेत. त्यात वृत्ती, विचार आणि भावनांची योग्य दिशा जाणून घेण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक शक्तीचा गुणधर्म निराळा (पण भगवताकडून) आलेला असल्यामुळे त्या पद्धतीने त्याचा प्रवास घडतो. 

शांती, दया, करुणा हे सर्व *भाव* विचार, भावना आणि कृती ह्या तिन्ही माध्यमातून साकार होणे महत्वाचे आहे - थोडक्यात आत आणि बाहेर तोच भाव असला पाहिजे.  भगवंताला ह्या तिन्ही माध्यमातून प्रत्यक्षात आपण आणू शकतो. 

हरि ओम.


 श्री 

सर्व भगवंत बघतो. त्याच्यावर सोपवणे. म्हणजे खूप जीवाच्या स्थितीतील विचार करू नये - की ह्यावरून हे होईल, किंव्हा ते होईल, किंव्हा असे झाले तर किंव्हा तसे झाले तर, किंव्हा स्पष्टीकरण शोधत राहणे आणि त्यामुळे श्रद्धेची शक्ती कमी होण्याची संभावना वाढणे. 

विचारांच्या पातळीवर वावरत राहिलो आपण, तर जगाचा स्वभाव, जो गूढ आणि दैवी स्वरूपाचा आहे, तो जाणवणार नाही. ह्यालाच निजवृत्ति, अहं, किंव्हा जडत्व असणे असे म्हणतो आपण. विचार चक्र आणि भावना चक्र आपल्याला _जड_ ठेवतात. 

सूक्ष्म होणे गरजेच आहे म्हणून जीवाच्या मनाने दाखवलेला मार्ग सोडून द्यायला लागतो (त्याच्या मर्यादा ओळखायला लागतात) आणि वृत्ती शांत होण्याचा मार्गाकडे प्रयत्न सुरू करायला लागतात.

त्यातील एक मार्ग आहे नामस्मरण.

हरि ओम.


 श्री 

विचार, भावनेचं पाठबळ भावांतून निर्माण होत - त्यांचा गुणधर्म भाव देतो. म्हणून विचारांचा स्वभाव किंव्हा वागण्याची पद्धत किंव्हा भावना देखील, हे भाव किंव्हा सूक्ष्म स्थिती ठरवतात/ कारणीभूत होतात/ परिवर्तन पावतात. त्या सूक्ष्म स्थितीच्या अस्तित्वामुळे अनेक विचार पद्धती (शक्तीचा प्रकार) किंव्हा अनेक भावना चक्र उदयास येत राहतात. त्यावरून जीवाचा स्वभाव घडतं राहतो, तो वावरतो, अनुभव घेतो, प्रवास करतो, भोग झेलतो वगैरे. 

अनुभव किंव्हा जाणीव अनेक स्तरांवर असतात आणि त्यातून विचारांचं आणि भावनांच _कार्य_ ठरतं/ परिणाम करतात/ अनुभव देतात. 

 _कार्य_ - things that have been inherited, which comes into being and cause an action. Perception is informed by this action. In the purest terms, action equals Existence. 

Hence we are required to surrender to Existence/ God.

Hari Om.

0 Comments:

Post a Comment

<< Home