श्री
श्री
काम करत राहणे ह्यांनी विषय किव्हा अपुरेपणा संपेल का? काम
किव्हा कृती आणि तिच्या पाठीमागचा हेतू चंचल आणि निर्माण होत असल्यामुळे तो चक्र
निर्माण करतो आणि त्यात स्वतःला गुंतून ठेवतो. हे निर्माण करणे, चक्रात ठेवणे,
अनुभव देणे, विचार आणि भावना त्यातून उमटणे आणि काहीतरी करत राहणे – हे भगवंत मुळे
होत असत. त्यात जीव मग निर्माण होतास अनेक भावनांना सामोरे जाणे आले. “सामोरे
जाणे” किव्हा भोग किव्हा परावलंबन हि स्थिती दिली गेली आहे आपल्याला. हे शक्तीच
कार्य आहे आणि ते आपल्याला झेलायला लागणार. कितीही केल तरी हिशोभ संपत नाही, हिशोब
ही ठेवून चालत नाही, हिशोभ मांडता येत नाही, मांडला तरी त्याचा काहीही उपयोग होत
नाही. वृत्तीतून किव्हा हेतू ठेवून कुठलीही गोष्ट समाधान देऊ शकत नाही. म्हणून
“वेळ” देणे म्हणजे खूप खोलवर पद्धतीने एखादी गोष्ट किव्हा व्यक्तीची “जाणीव”
होणे - इतकी खोल कि हेतू किव्हा अहं
वृत्ती हि स्थिर होऊन किव्हा गळून भगवंत प्रकट होईल. त्यासाठी बुद्धी पाहिजे असे
काहीही नाही. स्तब्द ऐकून प्रक्रिया काय होते हे समजून घ्यावे. आपल्याला भीती असते
ती मरणाची. त्यातून तात्पुरत्या व्याख्या, बदल, कमीत कमी वेळ हातात राहणे अश्या
संकल्पना आपण निर्माण करतो. जे काही प्रगती बद्दल बोललेलं जात असते, ते आणखीनच
वेळेची टंचाई मांडत राहत, मग त्यातून स्वस्थता कशी मिळणार?! आणि जेवढे आपण व्यवहारात
स्वतंत्र होण्याचा अट्टाहास धरतो, त्यातून आपण आणखीनच परावलंबी आणि संकुचित होतो
आणि सर्व गोष्टी कदाचित अर्थहीन होतात. आपल्या विचारांना, भावनांना किव्हा कृतीला
काहीही किंमत उरत नाही. म्हणून व्यवहारात स्वतंत्र होण्याचा अट्टाहास धरू नये कारण
त्यातून आपली वृत्ती आणखीनच अहंच्या दिशेने जाते आणि चंचलता वाढवते.
हरी ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home