Monday, July 29, 2024

श्री

 श्री 


स्फुरण खूप गूढ आणि पसरलेले असते. त्याची सुरुवात आणि शेवट कळत नाही बुद्धीला आणि त्या प्रमाणे बुद्धी वागत राहते - शंका, भीती, त्रास, चिंता. म्हणजे ह्याचा अर्थ की बुद्धीचा स्वभाव हा स्फुरणातून घडतो आणि त्यामुळे अर्थ निर्माण होतात आणि जगही. जग भासणे स्फुरणाची दृश्य स्थिती किंव्हा स्फुरण परिवर्तन होत दृश्यात येतं. म्हणजे स्फुरण ही भगवंताची क्रिया आहे, कार्य आहे आणि त्यातून आपण होतो, बदलत राहतो, गुंतून राहतो, अनुभव घेतो, प्रतिक्रिया देतो आणि हे चक्र सुरू राहत. हे असणार आहे. अस्तीत्व म्हणजे शुध्द अद्वैत स्थिती आणि दृश्य जगाचा अनुभव.

तरीही राग येतो, चिंता करतो, विचारात राहतो, दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो, अट्टाहास धरतो, अपेक्षा करतो वगैरे. आणि असे करत राहताना दृश्याचा परिणाम भोगतो.  

गोष्टींचं होणे, आकारास येणे, भास होणे, निघून जाणे, बदलत राहणे फक्त भगवंताच्या हातात आहे, म्हणून त्याला पकडण्याचा आणि त्यात गुंतण्याचा अट्टाहास करू नये. त्याला विशेष बौद्धिक अर्थ लादण्याची जरुरी नाही. आणि बुद्धीतून विचार चक्र द्वारे "प्रतिक्रिया दाखवण्याची" गरज नाही. 

जे आहे ते आहे. जे येणार आणि निर्माण होणार ते होणार. जे जाणार, ते जाणार. हा बदल किंव्हा स्फुरण भगवंताचे आहे. त्याला शांततेने स्वीकारा.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home