श्री
श्री
आपल्या हातात कार्य करणे भगवंताने सांगितले आहेत. गोष्टींची निर्मिती, ती शक्ती, शक्तीच वावरणे, जाणीव असणे, त्यातून आकारास येणे, बदल होणे, अनुभव येणे त्याच्यातील हे घटक आहेत.
असे होणार, आपण गुंतणार, संबंधित राहणार, तात्पुरते वाटणार, परिणाम होणार, दृश्याचा परिणाम होणार, दृश्य दिसणार. हे सत्य नाही किंव्हा हा भाव योग्य नाही, हे मनाला सांगायला लागतं.
त्यातून जाणीव, भाव शुध्द करणे किंव्हा होणे म्हणजे काय हे ध्यानात घ्यायला लागत आणि तशी वाटचाल करायला लागते. मुळात आपण कोण आहोत, किंव्हा अस्तीत्व म्हणजे काय आणि त्यात अनेक स्तर असतात का, हे जाणणे. ते जाणणे कुठल्याही गुणात असून करता येऊ शकतं, कारण सगळे गुण एकमेकांच्या संबंधात असतात आणि प्रत्येक गुणाला शांत होण्याची गरज असते. म्हणून भगवंताची कृपा, त्याच स्थान आपल्या जीवनात आणि त्याचा परिणाम - ह्या गोष्टी आपल्या गुणातून जाणवायला लागतात.
त्यासाठी वृत्ती, आकार, गोष्टी, संबंध आणि अनुभव दिलेले आहेत. त्याचा आनंदाने स्वीकार करावे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home