श्री
श्री
सर्व भगवंत आहे, म्हणून आपली कृती अथवा कार्य त्याच्याकडे पोहोचते आणि त्याच्या अस्तित्वाने होत आहे, हे ओळखावे. म्हणून काहीही केलं, तरी काळजी नसावी - ते योग्य ते परिणाम घडवून आणेल. घाई करून उपयोगाचे नाही आणि अपुरेपणातून हेतू निर्माण करून कार्य करावे हे ही योग्य नाही. स्वतःला विचारणे की आपली वृत्ती कशी काम करते आणि त्यावरून कुठल्या प्रकारचे विचार येत आहेत?
परिस्थितीला आपण एवढा अर्थ का देत राहतो?! आणि एवढे का गुंतून राहतो?! वृत्ती शांत करण्याचे मार्ग त्या व्यक्तीच्या मनोरचने प्रमाणे निर्माण होतील - ते जोपासावेत - ते संस्कार देत राहावेत.
एका पद्धतीने सांगायचे झाले तर " मी " होणे हे गूढ क्रियेतून होणारा भाव आहे आणि तो अनंत काल प्रत्ययास येऊन त्या शक्तीचा परीणाम होता होता त्याचे संस्कार खूप खोलवर रोवले गेले आहेत. मूळ कार्य आहे त्या शुध्द शक्तीचे, जी सूक्ष्मातून स्थुलात किंव्हा आदृष्यातून दृश्य जगात आली आहे. किंव्हा स्वतंत्र असलेली स्थिती अंतःकरणात येऊन प्राणाचे रूप धारण करून शेवटी जड द्रव्यात म्हणजे शरीरात आली आहे. एवढ त्यात परिवर्तन झालं आहे आणि प्रत्येक परिवर्तनात त्याचा स्वभावही आणि परिणामही बदलेला आहे.
ह्याचा अर्थ असा की आपल्याला अस्तीत्व शुध्द आत्मा, अंतःकरण, प्राण आणि शरीर ह्या चार पद्धतीने आढळून येत. प्रत्येक स्वतंत्र दृश्य दर्शवते आणि एकमेकांमध्ये संबंधित असल्यामुळे, एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाता येते मनाला. आणि एका स्थितीचे होणे ते इतर स्थितिंवर अवलंबून असते, हे ध्यानात येते.
म्हणून आपण कोण आहोत, ह्या प्रश्नांचे घटक चार आहेत. शुध्द जाणिवेचा मार्ग साखळी प्रमाणे शरीर, प्राण, अंतःकरण आणि आत्मा असा समजला हवा. आणि सध्या आपल्याला _अस्तीत्व_ एका स्थितीच्या स्वभावाने कळून येत आहे.
अजून एक गोष्ट अशी की मनोरचने प्रमाणे काही स्पंदने कळून येतात आणि इतर नाही. जे कळून येत नाही, त्याने घाबरून न जावे. ते भगवंता कडून येत आहेत किंव्हा निर्माण होत आहेत आणि आपल्या पर्यंत पदार्पण करत आहेत, हे ध्यानात ठेवणे. म्हणजे आपण सतत समवाद साधत असतो भगवंताशी. त्याला क्रिया किंव्हा संस्कार म्हणू. तो संवाद आणखीन प्रखर होण्यासाठी नामस्मरण करणे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home