Tuesday, September 03, 2024

श्री

 श्री 


सर्व जग भगवंत चालवतो. कुठल्याही संकल्पनेला स्वतंत्र बघण्याचा, हाताळण्याचा प्रयत्न जरी केला, तरी तो बदलत राहतो, परावलंबी असतो आणि आपल्या इच्छेने पूर्ण होत नाही किंवा आकारास येत नाही किंवा जात नाही. थोडक्यात मानवी इच्छा ही देखील बदलणारी आणि परावलंबी संकल्पना आहे जी खूप घटकांवर, स्थितींवर अवलंबून असते आणि त्या प्रमाणे देखील वस्तू बघते आणि प्रतिक्रिया देत राहते. म्हणून तसे पाहिले तर काय ठोस आहे किंव्हा स्थिर किंव्हा शाश्वत आहे?! म्हणजे चालवणारे यंत्र औरच आहे! जीव नाही. त्या यंत्राला शक्ती म्हणतात किंव्हा अस्तीत्व भाव. 

आपली स्थिती आपल्याही हातात नसते आणि ती कशी आली आणि कुठे नेणार ह्याची मर्यादित कल्पना जीव करत राहतो, म्हणून त्याच्या मुळे भीती ही भावना निर्माण होते.

 तस पाहिलं तर विचारांचे आणि भावनांचे स्तर असतात स्थूल पासून ते सूक्ष्म पर्यंत ज्याचं मूळ आहे जाणीव. जशी जाणीव, तसे इतर चक्र, तसे विचार आणि तशी भावना आणि तसा परिणाम. 

परिणामही स्थूल ते सूक्ष्म पर्यंत होत जातात. म्हणून क्रिया किंव्हा कृतीचा परिणाम खूप खोलवर होत राहतो आणि आतून संस्कार घडवून आणत राहतो. It is a continuous process of going in and coming out or the inward - outward relationship. 

त्या पार्श्वभूमीवर कृती काय करावी हे ठरवावे. कृती करून आपण शुध्द होण्याची शक्यता त्यात आहे. ते कसे, कधी, केव्हा अशी शंका घेऊ नये, कारण त्यातून कृती डळमळीत होते. जे करायचं ते करायचं.

दुसरी गोष्ट ही की दृश्यच अस्तित्व, स्वभाव, बदल ही गोष्ट स्थिर नाही आणि तिचा परिणाम राहतो अस्थिर वृत्ती मुळे. एकंदरीत आपण होणे हे देखील त्या क्रियेचा परिणाम आहे. मूळ क्रिया भगवंतामुळे होत आहे, ही भावना आत रुजायला हवी. ते पचनी पडलं की वृत्ती तशी शांत होत जाते आणि भगवंत शेवटी प्रकटतो.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home