श्री
श्री
कुठल्या जाणिवेतून शक्तीची क्रिया होते किंव्हा निर्मिती होते किंव्हा संबंध जोडले जातात हा महत्वाचा भाग आहे. विचार किंव्हा भावना शक्ती आहे, जी जाणिवेतून येते. योग्य सूक्ष्म जाणीव तसे विचार आणि भावना निर्माण करेल. नुसत्या स्वतंत्र विचारांच्या पार्श्वभूमीवर वृत्ती किंव्हा जाणीव नाही कळणार, निदान त्या हेतूने तरी नाही! प्रत्येक शक्तीची क्रिया आहे ( ज्याला हेतू असे आपण मानतो) ज्यामुळे त्याचा आपल्यावर परिणामही होतो.
आता प्रश्न असा आहे की विचार आणि भावनेचा हेतू काय असावा?...तो निश्चित स्वीकारण्याचा नाही. तो चळवळ करण्याचा आहे आणि स्वतंत्र सिद्ध करण्याचा आहे. मग त्यावरून वृत्ती कशी कळेल?!... ती कळत नाही, म्हणूनच बरे आहे, नाहीतर आपण भगवंताचा ताबा मिळवण्याच्या हेतूवर पुढे मागे बघितले नसते!! अशी आपली गत!
शरण गेल्या शिवाय, स्व अर्पण केल्या शिवाय भगवंत दिसणार नाही. मनाने दाखवलेला स्वार्थी हेतू सोडायला हवा. त्या अध्यात्मिक क्रियेचीही अपेक्षा करू नये! त्याला कृपा म्हणतात.
एकही गोष्ट स्थिर नसते. अस्थिरातून दृश्य जग आणि त्याचा आत - बाहेर परिणाम उमटतो आणि तो स्मरण शक्ती घडवतो. अस्थिर क्रिया सूक्ष्मातून उमटून सर्व ठिकाणी पसरून " बहिर्मुख " होते. त्याला शांतपणे स्वीकारावे, बघणे, श्रद्धा ठेवणे.
त्यातून शांती रस लाभेल.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home