श्री
श्री
संस्कार अनंत काळ करायला लागतात आणि त्यात भावना, विचार, कृती सामील असतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे एकमेकांशी संबंधित आहे, म्हणून योग्य संस्कार होणे ह्याला सर्वांगीण चिंतन, प्रयत्न करावे लागते. सर्व प्रयत्नांच शेवट म्हणजे शांत भाव प्रकट होणे. ह्यातून हे कळेल की सर्व निर्मिती किंव्हा विघटन शांत भावातून झाले आहे; म्हणून कुठल्याही गोष्टीचं किंव्हा परिस्थितीच किंव्हा अनुभवाचं मूळ आहे ते शांत भाव. किंबहुना गोष्ट किंव्हा आकार की अनुभव हे मिश्रित चक्र घेऊन उदयास आलेले आहे, म्हणून त्याचा ठाम पत्ता आपल्या शक्ती द्वारे होऊ शकत नाही; त्याला दैवी शक्तीची गरज आहे. म्हणजेच की स्वतःला अर्पण करणे.
कृती - भावना - संकल्पना हा उलट प्रवास आहे किंव्हा संकल्पनेतून भावना आणि मग कृती असा आतून बाहेर येण्याचा प्रवास आहे. कुठलाही प्रवास केला तरी मधील स्थिर बिंदुची जाणीव होणे महत्वाचे आहे, ज्यावरून वरचा प्रवास गोल - गोल त्या बिंदू भोवती फिरत राहतो. Spiralling towards the 'centre'. सर्व जग आणि आत - बाहेर संबंधित क्रिया बिंदू मुळे होतात, ही विसरू नये.
गोष्टींचे होणे, अनुभवात वावरणे आणि कृती करायला भाग पाडणे, ह्या मागे वरील क्रिया असते आणि बिंदूची इच्छा असते. ते बिंदू कळण्यासाठी द्राविडी प्राणायाम आपल्या वाट्याला आले की काय हा विचार उद्भवू शकतो. तर तसे असेल. द्राविडी प्राणायाम का होई ना, आपण श्रद्धा सोडू नये.
हरि ओम.
श्री
काही गोष्टींचा परिणाम खूप खोलवर असतो आणि जसा तो आत जातो, तस त्याच स्वरुप बदलत राहत. आत जातांना खूप साऱ्या स्तराशी संबंधित राहतो म्हणून तो कसा उफाळून परिणाम करेल दुसरीकडे हे सांगता येत नाही. गोष्टींचं अस्तीत्व हे क्रियेवर निर्भर आहे - जी आपण आत ते बाहेर ते आत आणि बिंदू भोवती फिरणे असे प्रामुख्याने दोन हालचाली आहेत. म्हणून दृश्य ( किंव्हा द्वैत ) आणि अदृश्य ( किंव्हा अद्वैत ) हे दोन भाग अस्तित्वात येतात.
वरील सर्व आकलानाच परिणाम हा की व्यवहारात प्रयत्न, सैय्यम, श्रद्धा आणि कृपेची जरुरी आहे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home