श्री
श्री
भगवंताचे अस्तीत्व आणि त्याची क्रिया हे असतेच. ते अस्तीत्व किंव्हा ती शक्ती कळण्यासाठी (म्हणजे स्वतःच रूपांतर होण्यासाठी) त्याचे नाम आत्मसाद करायला लागते.
आपण स्वतः एक शक्ती आहोत. शक्तीची क्रिया असते, संबंध असतो, निर्मितीचे स्वरूप असते आणि परिणाम असतो ( भोग किंव्हा फळ किंव्हा हेतू ). आपण एक शक्ती आहोत म्हणजे एक स्वभाव धारण केला गेला आहे. त्या स्वभावामुळे येणारे अनुभव आणि जगाशी संबंध निर्माण होतात.
भगवंताची शक्ती होण्यासाठी, त्याचे नाम घेणे अवश्य आहे. ते नाम घेत राहणे कुठल्याही कारणावर, परिस्थितीवर, स्वतःवर, काळावर, स्थळावर, संबंधावर अवलंबून *नाही*. म्हणजे जगाची अशी कुठलीच परिस्थिती नाही किंव्हा वृत्ती नाही जी त्या नामाच्या आड यावी. ते घेणे आपल्याला सोप्पे वाटतं नाही, किंव्हा त्यावर प्रेम जडत नाही - ह्याचाच अर्थ असा की आपण किती परावलंबी स्वतःला करून घेतलेले आहे, किती प्रमाणात स्वभावाला चिकटून घेतले आहे आणि विषयाधिन झालो आहोत - की नामाचे अस्तीत्व ध्यानी येतच नाही! अशी आपली ( ह्या शक्तीची ) गत!
अल्प शक्तीचे परिणाम, परावलंबन असणे आणि तात्पुरते असणे आणि अपुरे असणे हे क्रियेचे स्वरूप आहे. म्हणून एका पद्धतीने लोक अशे का वागतात, हे त्यांनाही पूर्णपणे कळत नाही आणि त्याची भीती त्यांना असते. ती भीती झाकण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न ते करतात. ते अपुरे असल्यामुळे, ती भीती तशीच राहते! मग त्यात दुःख, राग, कष्ट अश्या गोष्टींना सामोरे जायला लागते. त्या गोष्टी आपणच निर्माण करतो! फक्त ते कशे निर्माण होतात, ते बुद्धीच्या पलीकडील रहस्य आहे! म्हणून आपण त्यात गुंतून राहतो आणि कोडे सोडवण्याच्या कायम अधीन होतो...( ह्याचा दुसरा अर्थ असा की सर्व येणे, होणे, निर्माण करणे ही दैवी इच्छा आहे, म्हणून ते येऊ देणे आणि त्याला न घाबरणे)..
त्याला मार्ग हाच की भगवंताची संकल्पना मनात आणणे, वाढवणे आणि त्यात कायम स्थिर होणे.
हरि ओम
0 Comments:
Post a Comment
<< Home