श्री
श्री
कुठलाही वेळ वाया जात नसतो. सर्व काळ किंव्हा स्थळ भगवंतहून निर्माण होतो, म्हणून त्याची शक्ती कार्य करत असते सर्व ठिकाणी. त्याचा परिणाम असा होतो की जाणीवेच्या बऱ्याच छटा निर्माण होऊन द्वैतचा किंव्हा दृश्याचा अनुभव पदरी पडतो, झेलायला लागतो, स्वीकारायला लागतो आणि पुढे तोच अनुभव भगवंताला अर्पण करायला लागतो. Received and pass it back to Him. हाच अस्तित्वाचा खेळ किंव्हा कार्य आहे. येणे आणि देणे. अर्थात ही क्रिया सरळ धाग्या सारखी नाही. दृश्यात येताना बऱ्याच स्तरातून स्वभाव निर्माण होत आणि परिणाम करत आपल्या जाणिवेत एखादा आकार येतो आणि तोच योग्य पद्धतीने दृष्टिकोन ठेऊन अर्पण करायला लागतो, तरच कृतीचे परिणाम मनावर चिकटत नाही किंव्हा कृतीची बाधा होत नाही.
बुद्धीने करायचे म्हणले तर त्या प्रवासात त्याचे त्याचे वळण आहेत. श्रद्धेने करायचे म्हणाले तर वळणाचे स्वरूप वेगळे आहेत. मार्ग कुठलाही घ्या, तो स्वतःच्या स्वभावाने निर्माण करत पुढे सुक्ष्मा पर्यंत पोहोचायला लागतो. मार्ग आपली शक्ती शोधणारच. ती भगवंताची इच्छा आहे की आपली शक्ती त्याच्या शक्ती मध्ये विलीन होऊ देणे. ही संकल्पना त्यातच विधिलिखित आहे. म्हणून अनुभवाचं स्वरूप एका प्रकारे आपल्याला येत राहत.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home