Wednesday, September 25, 2024

श्री

 श्री 


प्रत्येक जीवाला किंव्हा आकाराला त्याचा त्याचा स्वभाव असतो आणि त्यामुळे अस्तित्वात असण्याची जाणीव असते. स्वभाव म्हणजे गुण धर्म किंव्हा वासना आणि त्यातून निर्माण होणारे चक्र आणि शेवटी इंद्रियांचा आणि जगाचा संबंध. हे सर्व शक्तीचे, म्हणजे अस्तित्वाचे, कार्य आहे. त्या स्वभावापोटी जगात रमण्याची इच्छा मी निर्माण करतो. 

त्या रमणीयता मध्ये अनेक स्तारांच समावेश असतं, म्हणून अनेक प्रकारचे वासना किंव्हा स्फुरण येतात आणि जातात आणि ही साखळी चालू राहते. ते सर्व निर्माण होतात, ज्याच्यामुळे जो भाव निर्माण होतो किंव्हा अनुभवात येतो, त्याला " मी " असे धरून ठेवतो. त्या  साखळीची सुरुवात माहीत नाही, म्हणून पूर्ण स्वरूप किंव्हा आकार डोळ्या समोर कधीच येत नाही. 

त्या मुळे संकल्पनेला वाव असतो, निर्मिती होत राहते, शोध चालू राहतो, परिवर्तन घडतं राहत. ह्या सर्व साखळीच्या बाहेरून किंव्हा पलीकडून बघणे शक्य आहे का? म्हणजे आपली अपेक्षा इंद्रियांच्या द्वारे, वेगळेपणाने त्या साखळीच्या आकाराकडे " बघणे ". बघणे ह्या वरून आपण ठरवतो, निर्णय घेतो. ती क्रिया देखील हेतुवरून ठरवतो! म्हणजे आकार कळण्यासाठी गोष्टी हेतूवर निर्भर असावेत! 

त्या पद्धतीचा विचार करून साखळी कळेल का?! साखळी आपणच आहोत! त्या मुळे त्याच्या बाहेर जाऊन बघणे हे वास्तविक धोरण शक्य नाही. त्याचा परिणाम असा की मनात भीती तरी निर्माण होईल किंव्हा श्रद्धा. कितीही आकार किंव्हा साखळी कळण्याचा प्रयत्न केला तरी ते अतिशय गुंतागुंतीचे आणि अनेक स्तरात पसरलेले आढळून येईल आणि ते ही सतत बदलणारं! विचारांना सत्यपणा दिला तर हातात भीती येणार आणि शांततेला सात्यपणा दिला तर श्रद्धा अनुभवू. साखळी बघायची नाही इंद्रियांमुळे, ती शांत करायची आहे!

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home