श्री
श्री
दृश्याचे घटक आणि संबंधांचा किंव्हा त्यातून प्रकट होणाऱ्या भावाचे नाते असते. नाते अनेक प्रकारचे असते, सुक्षमापासून ते स्थूल स्थितीचे किंव्हा स्पंदना पासून ते विचार, भावना ते शरीर पर्यंतचे.
त्यातून एखादी गोष्ट आणि त्या बरोबरचे आपले संबंध "निर्माण" होते. म्हणजेच ही क्रिया गूढ आहे...आणि त्या क्रियेचे व्ययशिष्टे हे की अनंत हालचाली, रूपे सामोरे येतात, संबंधात राहतात आणि निघून जातात - चक्र प्रमाणे.
म्हणून दृश्यात येणे म्हणजे क्रियेत राहणे. त्यात विचार हे का ते, तिकडचे का इकडचे, त्या काळातले की ह्या काळाचे - ह्या सर्वांना वाव आहे किंव्हा ते होत राहणार. विचारांचा उगम दैवी शक्तीचे कार्य असल्यामुळे ते बरोबरीने काहीही निर्माण करू शकते, जी त्या शक्तीची किमया आहे.
मी कुठून आलो, हा भाव किंव्हा ही दृढ भावना कदाचित पूर्वी कुठल्याही कृतीत सामावलेली असावी. आता मी स्वतःला खूप घाबरतो - त्यातून संबंधांचे स्वरूप कळून येईल की आपण कुठल्या दिशेने जात आहोत.
एक संकल्पना आठवणीची अशी की पूर्ण पर्यावरण म्हणजे मी आहे, म्हणून मी शांत होतो. तसे काहीसे वृत्तीची जाणीव बऱ्याच लोकांमध्ये वावरत असावी पूर्वी. आता मीच आहे, पर्यावरणाशी माझा काही संबंध नाही...त्या भावातून बहुसंख्य लोक वावरतांना दिसतात. औषध पाहिजे ते आतील स्थिती बदलण्यासाठी - बाहेरचे प्रयत्न ठिगळ लावण्या सारखे वाटतात.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home