श्री
श्री
अर्धवट वाटणे आणि सांत्वन करणे आणि बडबड करत राहणे हे काही केल्या लोकांचे थांबत नाही! स्वतःचे विचार तरी कुठे थार्यावर असतात?! विचार धारा किंव्हा कुठलीही गोष्ट आपल्या हातात नाही. याने हे आकलन व्हायला हवे की समाधान कष्यावरही अवलंबून असण्याची गरज नाही!
विचार चक्र ही अस्तित्वाची एक स्थिती दाखवते - मुख्यतः तात्पुरतेपण आणि परावलंबन आणि त्यातून सिद्ध होण्याची गरज.
मला काळजी आहे, हे मान्य आहे. पण ती सिद्ध करण्याची नाही कारण त्याने काहीही होत नाही. काळजीचे मूळ कुठे आहे आणि ते का रुपात येऊ पाहते हे स्वीकारायचे आहे. मग त्यासाठी मुद्दामून काहीही करत राहणे आणि धावाधाव करणे गरजेचे नाही. मला उत्तरे माहीत नाही, सत्य माहीत नाही, ह्यामुळे ते होते आणि त्यामुळे हे होते - ह्याच्यात फारसा रस नाही. ह्यातून काय उद्भवेल माहीत नाही! हे माहीत असणे गरजेचे आहे का, ते ही माहीत नाही!
काहीतरी घडेल. घडू दे! घडणे हा स्थायी भाव आहे, तर ते होणार!
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home