Saturday, November 09, 2024

श्री

 

श्री 

 अध्यातमामध्ये बऱ्याच पद्धतीने अंतर्मुख होणे म्हणजे काय, हे सांगितले आहे. त्यावरून सारासार विचार करून अपेक्षित भाव काय आहे तो ओळखावा आणि प्रयत्न करावा. आणि कदाचित अभिप्रेत तेच असावे. 

 सत्य जे आहे, ती बुद्धी फेरफार करून वेगवेगळ्या पद्धतीतून मांडू पाहते  - त्यात बहिर्मुख स्वभाव, धर्म, अंतःकरणच्या गोष्टी, इंद्रियांचे स्थान, आतील क्रिया, चक्र आणि घटक, वृत्ती आणि वासना, बदल होण्याची अपेक्षा, अट्टाहास आणि उन्मन अवस्था, भगवंत वस्तू आणि प्रवास हे सारे घटक येतात. सर्वांगीण पद्धतीने अस्तीत्व आहे, ते मांडतांना मनाच्या भाषेत मांडायला लागते.

 मौज अशी आहे की वाचक घटकांचे संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातील दिशा, प्रवास, अपेक्षा असे गुणधर्म त्यावर जोडतो. पहिले काय, नंतर काय, महत्वाचे काय, दुय्यम काय, हे विचार तो करतो. पण त्यातून आपण तिथेच गोलगोल फिरत राहतो! 

 अर्थात ही सुरुवात आहे. एकदा हे कळले की बुद्धीची मर्यादा असावी आणि ती मान्य केली गेली, आनंदाने स्वीकारली गेली, की श्रद्धेची वाढ होते. मग वरील गोष्टी आपोआप सर्वांगीण पद्धतीने कळतात. मग आपण खरे शांत होतो. शांत होणे म्हणजे पूर्ण होणे.

 वरील संकल्पना जीवनात देखील लागू करता येते. घटकांचा विचार करणे, पुढे, आत्ता, नंतर या बद्दल आपण एक प्रक्रिया किंव्हा संकल्पना मांडू पाहतो आणि त्या दिशेने वाटचाल करतो. गोष्टी बदलत राहतात, म्हणून वाटचाल तिथेच फिरत राहते. हा अनुभव येणे महत्वाचे असावे.

 तिथून श्रद्धा वाढू शकते आणि अंतर्मुख होण्याचा प्रवास सुरू होतो. आलेले अनुभव, कितीही त्रासिक वाटले तरी त्यातून साखळी सोडणे हे अपेक्षित असते की नाही याचा विचार करावा. कदाचित काहीतरी प्रबोधन असेल तो अनुभव निर्माण होण्यासाठी आणि आपल्या वाट्याला येण्यासाठी. तर शांत होऊन कार्य करत राहावे. काळजी करू नये, कारण त्यातून आपण तिथेच फिरत राहतो. 

 श्रद्धा वाढवणे.

 हरि ओम.

  


श्री 

 शांत होऊन सर्व कार्य घडतात, यावर पूर्ण श्रद्धा ठेवणे. आपण बेचैन असलो, तर त्याच पद्धतीने स्पंदने येऊ पाहतात आणि क्रियेत गुंतून ठेवतात. म्हणून भगवंताच्या कार्यावर, शक्तीच्या रुपावर, अनुभवांवर, हालचालींवर, स्वतःवर पूर्ण श्रद्धा ठेऊन स्थिर व्हा. 

 अस्तित्वात आहोत, बरेच गोष्टी समोर येणार आहेत....शांतीने त्याकडे बघा.

 हरि ओम.

 

 

0 Comments:

Post a Comment

<< Home