श्री
श्री
अस्तित्व अशी गोष्ट आहे की अनंत क्रियांचा समावेश असल्यामुळे अनंत प्रवाहात असलेले आकार, अर्थ, परिस्थिती, वेगळेपण प्रकट होते. ह्यांनी भांबावून जाऊ नये.
हे नैसर्गिक आहे असे ओळखून, जे आपल्या आकलनात येऊ पाहते, तसे कार्य करत राहावे. श्रद्धा असणे की पूर्ण भगवंत इथे हाजिर आहे. त्याच्या सानिध्यात, साशनात, घरी आपण सुरक्षित आहोत. कार्य करायला त्याची इच्छा आहे, तर ते करावे. भोग जे असतील, ते प्रसाद म्हणून स्वीकारावे.
कार्य करत राहताना त्याला स्मरून कृती करणे. त्याचा संबंध कसा असतो, याची चिंता न करणे आणि उत्तरही शोधू नये. जे काही चक्रात आहोत आणि परिणाम भोगत आहोत, त्यात त्याचे स्मरण ठेवणे. जे प्रकट होईल आत आणि बाहेर, ते होऊ देणे आणि नैसर्गिक आहे, असे ओळखणे.
तसे केल्याने कालांतराने शांतता लाभेल.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home