Saturday, November 09, 2024

श्री

 श्री 


आपण किंव्हा होणे किंव्हा असणे ही क्रिया "auto pilot" समजली हवी. अस्तित्व हे माध्यम असल्यामुळे स्पंदने निर्माण होऊ पाहतात आणि त्यातून असंख्य वासना, चक्र, भाव आणि आकार होतात आणि एकमेकांवर अवलंबून राहतात. _आस्तित्व म्हणजेच स्पंदन पावणे_. 

यातून हे दिसून येईल की अस्तीत्व शक्तीची क्रिया आहे, ते नुसते रिकामटेकडे बसलेले नाही! त्या स्पंदनाच्या द्वारे अस्तीत्व शक्ती प्रकट पावते किंव्हा जाणिवेतून बाहेर येऊ पाहते. ही _सर्वात नैसर्गिक असण्याची क्रिया आहे._ 

ही नैसर्गिक स्थिती भावनेत समजून घ्यायला लागते. आपण नाही, त्याची शक्ती खरी म्हणजेच "auto pilot being". हा अनुभव कसा आहे, तर तो पूर्ण शांती भाव निर्माण करणारा आहे. आपण जर नसलो, तर एवढे होणार असेल, तर काय हरकत आहे अनुभवायला शांती भाव?!!

म्हणून उगमाची काळजी करू नये, सबंधातून कोडे सोडवण्याचा अट्टाहास धरू नये, स्वतःची काळजी करू नये, विषयाचे विघटन करून स्वतःला दोष देऊ नये, दुरुस्त करण्याच्या मागे पडू नये, अहं वृत्ती शांत करावी, फक्त logic वापरून निर्णयाची घाई करू नये, निर्णय दिला तरी त्यात स्वार्थी हेतू राहू नये, माझं काय होईल ह्या चक्रात अडकु नये....

अजून एक गोष्ट की _रूप_ येणे, बदल पावणे, आणि कुठल्याही आकारात कधीही, केव्हाही, कसेही जाणवणे - हे पूर्ण स्वीकारणे. सर्वांगीण भाव आत्मसात करून हे सर्व रूप भगवंताच्या शक्तीने प्रकट पावत आहे, अशी श्रद्धा बाळगावी.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home