श्री
श्री
क्रिया होणे ह्याने "धरून ठेवणे" हा भाव त्यात सामील असतो. अस्तित्वाचे स्तर असतात, आणि ज्या पद्धतीने "धरणे" हा भाव घडतो, तशी ती क्रिया अनुभवास येते किंव्हा तशे ते घटक दिसून येतात आणि ते परिणाम करतात. मग आपण त्या धरण्यातून संबंध, घटक, क्रिया, पुढे, मागे, वर, खाली, काल, उद्या, गार, गरम, खडक, पाणी, थांबणे, चालणे, धावणे - असे अनंत अर्थ लावतो. कुठलाही शब्द हा प्रवाहातून आणि गुढतेतून प्रकट झाला असतो जाणिवेत, म्हणून तो "स्थगित" नसावा किंव्हा कायम नसावा किंव्हा त्यातून पूर्ण भाव होणे अशक्य. हे ध्यानात राहू देणे. ह्याचाच अर्थ की आपल्याला _प्रवाहाचा_ अनुभव येत राहणार आहे.
प्रकरण आहे निर्मिती आणि हेतूच. निर्मिती होत राहताना व्ययक्तिक हेतू किंव्हा भाव ठेवले तर इतर विचार आणि भावना देखील प्रकट होतात. म्हणून निर्मितीचे कार्य आणि श्रेय हे भगवंताला अर्पण होऊ देणे उचित आहे, म्हणजे त्या क्रियेला मन चिकटून राहत नाही किंव्हा गुंतून राहत नाही किंव्हा सिद्ध करत नाही. निर्मिती जशी होईल, तशी होऊ देणे - त्यातून स्वतःची व्याख्या ठरवू नये.
प्रवाहातून किंव्हा स्पंदनातून शांती भावा पर्यंत व्हायचे आहे. तथापि प्रत्येक क्षण त्या स्थितीला होण्यास कार्य करत असतो किंवा त्याचे विशिष्ठ स्थान असतं. म्हणजेच की प्रवाहाच्या स्वरूपाला पूर्ण स्वीकारावे.
ते नामस्मरणाने साध्य होते, असे संतांचे वचन आहे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home