Monday, February 03, 2025

श्री

 श्री 


भाव जाणणे हे गूढ प्रकरण आहे. ते जाणवायचे असते. जाणतांना त्यात अनेक स्तर, स्थिती, क्रिया, चक्र, रूप, वासना, विचार, भावना, देह अश्या साऱ्या गोष्टी दिसतील. हे सर्व घटक निर्माण होतात आणि एकमेकांमध्ये गुंतून राहतात. आणि ह्या साऱ्या _क्रियेतून_ - जी शुध्द चेतन असते किंव्हा भगवंताचे कार्य असते - स्वतःच्या भावाची जाणीव _प्रकट होत राहते._ 

जाणून घेणे हे श्रद्धेने करायला लागते - श्रद्धेचा भाव असायला लागतो. म्हणजे जाणतांना कुठलाही हेतू नाही, मुद्दा नाही, कोड नाही, स्वार्थ नाही, परिस्थिती नाही, कारण नाही, जवाबदारी नाही. ते निव्वळ प्रेमापोटी होत राहणे. त्यास _भक्ती_ असे म्हणतात. 

दैवी इच्छा, संकल्पना, कार्य म्हणजे त्याचे "कारण" ठरते उत्पत्तीसाठी. कारण शब्द इथे गूढ आहे, बौद्धिक नाही. गुढपणाला आपण दैवी इच्छा म्हणतो किव्हा श्रद्धेने स्वीकारतो. मानवी जीवाच कारण रुपावर, क्रियेवर, अनुभवांवर, परिस्थितीवर, वृत्तीवर आधारलेले आहे - म्हणून ते स्वार्थी ठरते. दैवी इच्छा - हा भाव - मानवी स्वार्थी भावाने बघू शकतं नाही. स्वार्थीपणाचे सर्व नियम सोडून भगवंत जाणून घ्यायला लागतो. 

दैवी इच्छा जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे नामस्मरण.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home