श्री
श्री
आकाश आणि आकार हे वेगळे नाहीत - आकाश _अस्तित्वातूनच_ आकार येऊ पाहतात आणि परत आकाशातच मिसळून जातात. स्थिरता अस्तीत्व भाव ओळखण्यातून येते, जेणे करून आकाश आणि आकारांचा खेळ किंव्हा संबंध आपण ओळखू शकतो.
कुठल्याही एका घटक्याकडे लक्ष कायम करणे कष्टाचं ठरते. आकाश अधिक उत्तम किंव्हा आकार महत्वाचं - असा काहीसा विचारांचा रोख शांती मिळवून देऊ शकत नाही. जी काही क्रिया आणि विघटन होऊ पाहते आणि वेगळे रुप दर्शवते, ते एकाच सत्यातून येते हे विसरू नये, म्हणजे मूल्य वस्तूंना तात्पुरते असते - स्वतःला देखील.
वरील संकल्पनेतून जे रहस्य निर्माण होत ते म्हणजे "भाव". Sense of belonging and being. आकाश काय, आकार काय, संबंध काय, अर्थ काय - _ह्याला भाव आहे_.
आकलन जे होणे आहे कृतीतून ते हे आहे. शिक्षण किंव्हा व्यवहार का करावा तो ह्यासाठी.
"प्रगतिशील" देशांचे एक दोष हा की एकाच बिंदूला प्राधान्य दिल्यामुळे जो भाव निर्माण होतो आकाशात (एकांतात) किंव्हा आकारात (कार्यात) तो म्हणजे भकास्पणा किंव्हा पोकळ भावना. हा भाव खूप कठोर, कोरडा आणि नैराश्य आणणारा असतो.
आपली वाटचाल कुठे चालली आहे, ते प्रत्येकाने पारखणे. प्रगतीच्या नावाने जर पदरी खूप भकासपणा येणार असेल, तर त्या कार्याचा काय उपयोग?!
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home