श्री
श्री
अस्तित्व ही व्याख्या आपण भाव, कार्य, क्रिया, हेतू, अर्थ, परिस्थिती, संबंध, वृत्ती, अपेक्षा - ह्या साऱ्या संकल्पनेतून आणि अधिक माहीत नसलेल्या गोष्टीतून समजून घेऊ शकतो. भगवंत पूर्ण आहे. सारे दृश्य जग आणि त्यातील विविध घटक किंव्हा रूपे त्याच्यातून येतात म्हणून त्या माध्यमातून भगवंताकडे आपण पोहोचू शकतो.
बुद्धी ही विशिष्ठ प्रकाराची शक्ती आहे. एका बाजूला भीती पोटी ती चक्रात गुंतून राहते आणि तात्पुरतेपणा वाटून घेऊन सैरबैर धावत राहते - जर/ तर किंव्हा हे करू/ ते करू किंव्हा खूप विचार आणि बडबड. ती स्वतःच्या स्वभावाला देखील खूप धरून राहते आणि अट्टाहास करते की गोष्टी अश्याच असल्या पाहिजेत! त्यावरून आपला स्वभाव असाच असणार आहे, हे ही त्याचे समर्थन असते! ह्या पद्धतीत उगम आणि शेवटची धडपड कायम राहिल्यामुळे, बुद्धी दमून जाते. बुद्धी _जर_ खरी मानली, तर तिने दाखवलेले सारे रूप खरे _असणारच_ असे ती सांगते.
ह्या क्षणाला बघायला दोन पद्धत आहेत - चक्रात गुंतून राहणे. आणि दुसर म्हणजे भगवंताची जाणीव प्रज्वलित करत बुद्धी सूक्ष्म करणे, प्रतिभा शक्ती येऊ देणे, शांत होऊ देणे, अट्टाहास सोडणे, प्रश्न येऊ देणे, शंकेचे स्थान ओळखणे, सत्य आत्मसात करत राहणे, सैय्यम बाळगणे, श्रद्धा प्रकट होऊ देणे वगैरे.
भगवंताची शक्ती बुद्धीच्या पलीकडेही असते आणि कार्य करत राहते. हे ध्यानात येऊ देणे आपल्या हिताचे आहे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home