Saturday, February 15, 2025

श्री

 श्री 


मनात असे विचार येता कामा नये - ह्याला आपण काहीच करू शकत नाही, किंबहुना काहीही करण्याची गरज नाही. प्रश्न असा आहे की इतरांच्या विचारांना आपण जे मूल्य देतो त्यावरून आपली वृत्ती आपल्यावर परिणाम करते - त्यावरून स्वतःची व्याख्या आपण तैय्यार करतो. 

सत्य जर पाहिले तर एकच शक्ती असल्यामुळे अनेक आकारांवर ती संबंध निर्माण करते आणि त्या त्या आकारावर एक परिणाम होतो. ह्याचे दोन अर्थ निघू शकतात. एक की आपण स्वतंत्र नाही आणि सगळे एकच आहे. त्यावरून भावना ताबा मिळवण्याची किंव्हा पळून जाण्याची ठेवावी की आपुलकी आणि निरहेतूची ठेवायची हे ओळखावे. पळून, पळून जाणार कुठे?! ताबा मिळून, मिळून भांडार पूर्ण होणार आहे का?! म्हणजे तत्पूर्तेपणा काहीही केल्याने जात नाही. तो अंतर्मुख होऊन सत्य काय आहे, हे जाणून शांत होतो. म्हणजेच की चक्राच्या परिणामाने व्याकूळ न होणे आणि सर्व चक्र भगवत भावाने बघणे किंव्हा ओळखणे. 

मनात काय सुरु असते आणि ते कुठल्या शब्दात बाहेर येते व्यक्तीकडून, आणि ते बाहेर येताच आपल्याला प्रतिक्रिया देणे आवश्यक असते का, हे ओळखणे. सत्य पाहिले तर प्रतिक्रियांची जरुरी नाही, म्हणजे वृत्ती, विचार, भावना सर्व ठिकाणी _प्रकट होणे_ असे त्याकडे स्वच्छ मनाने स्वीकारणे. 

हे गूढ प्रकरण आहे की जीवाची तळमळ कुठून असते आणि का होते? ह्याला देखील भगवंताची जाणीव होणे गरजेचे आहे. हा ही अट्टाहास नाही किंव्हा जबाबदारी नाही. शोध म्हणायला हरकत नाही किंव्हा भगवंताची इच्छा म्हणायला हरकत नाही. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home