Monday, February 03, 2025

श्री

 श्री 


बऱ्याच काळ आपण एखादी गोष्ट करत राहिलो, तर तेच योग्य आहे, तेच मी आहे, आणि तेच पुढे नेत राहणे आहे - अशी आपण समजूत ठेवतो. ह्याच उत्तर तसं सोप्प नाही, की असा हेतू आपण का बाळगतो. 

त्याला अनेक कंगोरे आहेत. त्याचे निरनिराळे नावे म्हणजे अहं, वृत्ती, चक्र, विस्मरण, भावाचे स्वरूप वगैरे. शुध्द शक्ती, जी भगवत स्वरूप आहे, ती म्हणजे "मन नाही" किंव्हा "मी" (देहबुद्धी) नाही. आपले स्मरणच सध्याचे असे आहे की तात्पुरतेपण भासवत राहते आणि त्या प्रमाणे आपण संस्कार मनावर कोरत राहतो. 

त्याचा उपाय म्हणजे सतत सांगत राहणे की मी भगवंताचा आहे, तो सांगेल तसं मी करेन. त्याच्या भावाच्या व्यतिरिक्त इतर सर्व काही गौण आहे. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home